T20 World Cup : पाकिस्तानविरूद्धच्या दर्जेदार प्रदर्शनानंतर जसप्रीत बुमराहला ICC कडून खास गिफ्ट
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बुमराहने केलेल्या कामगिरीचं बक्षीस त्याला मिळालं असून आयसीसीने त्याला मोठं गिफ्ट दिलं आहे.

वर्ल्ड कप सुरू असून भारताने आपण पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. रोहित शर्मा अंँड कंपनीने दोन्ही सामन्यात विरोधी संघांना पराभूत करत विजयाची पताका लावली आहे. भारताचा आजचा सामना यूएसएसोबत होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ तयार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. बुमराह भारताचं प्रमुख अस्त्र बनला असून प्रत्येक विरोधी संघाला त्याची दहशत आधीपासूनच असते. पाकिस्तानविरूद्धही पठ्ठ्याने मोक्याच्या वेळी विकेट घेत संघासाठी दमदार कामगिरी केली. अशातच बुमराहसाठी आनंदाची बातमी असून या चमकदार कामगिरीनंतर आयसीसीने बुमराहला खास गिफ्ट दिलं आहे.
आयसीसीकडून बुमराहला खास गिफ्ट
आयसीसीने टी-२० क्रिकेटमधील गोलंदाजांची रँकिग जाहीर केली आहे. या यादीमध्ये बुमराहने मोठी मुसंडी घेतलीये. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बरेच दिवस संघामधून बाहेर बसलेला. त्यामुळे येत्या टॉप 10 सोडा पण टॉप 50 मध्ये पण त्याचं स्थान नाही. पण बुमराहला वरती येण्यासाठी हा वर्ल्ड कप पुरेसा आहे. वर्ल्ड कपचे दोन सामने नाही झाले तर त्याने 42 स्थानांनी प्रगती केली असून आता तो 68 व्या स्थानावर आहे. बुमराह याचे रेटिंग 449 असून सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राहिलं तर त्याला टॉप 10 मध्ये पोहोचण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
इंग्लंज संघाचा राशिद हा पहिल्या स्थानावर, राशिद खान दुसऱ्या, नार्खिया तिसऱ्या, चौथ्या स्थानावर फारूकी तर पाचव्या स्थानावर हेजलवूड आणि सहाव्या स्थानावर भारताचा अक्षर पटेल हा आहे. मोहम्मद सिराजनेही 19 स्थानांची झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग 449 असून तो 69 व्या स्थानावर आहे.
दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने दुसरा सामना आपल्या गोलंदाजांमुळे जिंकलाय. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी 119 या धावसंख्येचा बचाव केला होता. भारताकडून अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या विरोधी संघांवर तुटून पडत आहेत.
