AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 Prize Money : फायनलमधील विजेत्याला मिळणार छप्परफाड पैसा, हरणाऱ्या टीमला किती कोटी?

T20 World Cup 2024 Prize Money : T20 वर्ल्ड कप 2024 मधील विजेत्या टीमला बंपर प्राइज मनी मिळणार आहे. जी टीम उपविजेता ठरेल, त्यांना सुद्धा भरपूर पैसा मिळणार आहे. ज्या टीम T20 वर्ल्ड कपमध्ये खेळल्या, त्यांचे हात सुद्धा रिकामी राहणार नाहीत. T20 वर्ल्ड कप 2024 साठी 11.25 मिलियन डॉलरची प्राइज मनी निश्चित करण्यात आली होती.

T20 World Cup 2024 Prize Money : फायनलमधील विजेत्याला मिळणार छप्परफाड पैसा, हरणाऱ्या टीमला किती कोटी?
IND vs SA T20 World Cup Final
| Updated on: Jun 29, 2024 | 2:45 PM
Share

ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल आज होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेची टीम आमने-सामने असेल. भारतातील स्थानिक वेळेनुसार, रात्री 8 वाजता ब्रिजटाउन बारबाडोस येथील केंसिंग्टन ओवल स्टेडियमध्ये फायनल सामना होणार आहे. यंदाच्या T20 वर्ल्ड कपमध्ये फायनल जिंकणारी टीम मालामाल होणार आहे. जी टीम उपविजेता ठरेल, त्यांना सुद्धा भरपूर पैसा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या मेगा इवेंटसाठी मेगा प्राइज मनीची घोषणा केली होती.

ज्या टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्या, त्यांना एकसमान 6.54 कोटी रुपये (787,500 डॉलर) देण्यात येतील. म्हणजे अफगाणिस्तान आणि इंग्लंडच्या टीमला सुद्धा चांगला पैसा मिळेल. T20 वर्ल्ड कपमध्ये यावेळी एकूण 20 टीम सहभागी झाल्या होत्या. एकूणच आयसीसीकडून यावेळी प्रत्येक टीमला काही ना काही रक्कम देण्यात आली आहे. सुपर-8 (दुसरा राऊंड) पुढे जाऊ न शकणाऱ्या टीम्सना प्रत्येकी 382,500 डॉलर (जवळपास 3.17 कोटी रुपये) मिळणार आहेत.

नऊ ते 12 व्या स्थानादरम्यानच्या टीम्सना किती पैसा?

नऊ ते 12 व्या स्थानादरम्यान ज्या टीम्स आहेत, त्यांना प्रत्येकी 247,500 डॉलर (जवळपास 20.57 कोटी रुपये) मिळणार आहेत. 13 व्या ते 20 व्या स्थाना दरम्यानच्या टीम्सना प्रत्येकी 225,000 डॉलर (जवळपास 1.87 कोटी रुपये) मिळणार आहेत. T20 वर्ल्डकपसाठी एकूण 11.25 मिलियन डॉलर (जवळपास 93.51 कोटी रुपये) प्राइज मनी निश्चित करण्यात आली आहे.

विजेत्या संघाला किती कोटी मिळणार?

T20 वर्ल्ड कप 2024 जिंकणाऱ्या टीमला 20.36 कोटी रुपये (2.45 मिलियन डॉलर) मिळणार आहेत. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा विजेत्या टीमला इतकी मोठी रक्कम मिळणार आहे. फायनल हरणाऱ्या टीमला म्हणजे उपविजेत्याला 10.64 कोटी रुपये (1.28 मिलियन डॉलर) मिळणार आहेत.

टी-20 वर्ल्डकप प्राइज मनी

•  विजेता : 20.36 कोटी रुपये

•  उप-विजेता : 10.64 कोटी रुपये

•  सेमीफाइनल : 6.54 कोटी रुपये

दुसऱ्या राऊंडमधून बाहेर होणाऱ्यांना 3.17 कोटी रुपये

• 9 ते 12 व्या स्थानावरील टीम : 2.05 कोटी रुपये

• 13 ते 20 व्या स्थानावरील टीम : 1.87 कोटी रुपये

•  पहिला आणि दुसऱ्या राऊंडमधील विजेते : 25.89 लाख रुपये

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.