
ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल आज होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेची टीम आमने-सामने असेल. भारतातील स्थानिक वेळेनुसार, रात्री 8 वाजता ब्रिजटाउन बारबाडोस येथील केंसिंग्टन ओवल स्टेडियमध्ये फायनल सामना होणार आहे. यंदाच्या T20 वर्ल्ड कपमध्ये फायनल जिंकणारी टीम मालामाल होणार आहे. जी टीम उपविजेता ठरेल, त्यांना सुद्धा भरपूर पैसा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या मेगा इवेंटसाठी मेगा प्राइज मनीची घोषणा केली होती.
ज्या टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्या, त्यांना एकसमान 6.54 कोटी रुपये (787,500 डॉलर) देण्यात येतील. म्हणजे अफगाणिस्तान आणि इंग्लंडच्या टीमला सुद्धा चांगला पैसा मिळेल. T20 वर्ल्ड कपमध्ये यावेळी एकूण 20 टीम सहभागी झाल्या होत्या. एकूणच आयसीसीकडून यावेळी प्रत्येक टीमला काही ना काही रक्कम देण्यात आली आहे. सुपर-8 (दुसरा राऊंड) पुढे जाऊ न शकणाऱ्या टीम्सना प्रत्येकी 382,500 डॉलर (जवळपास 3.17 कोटी रुपये) मिळणार आहेत.
नऊ ते 12 व्या स्थानादरम्यानच्या टीम्सना किती पैसा?
नऊ ते 12 व्या स्थानादरम्यान ज्या टीम्स आहेत, त्यांना प्रत्येकी 247,500 डॉलर (जवळपास 20.57 कोटी रुपये) मिळणार आहेत. 13 व्या ते 20 व्या स्थाना दरम्यानच्या टीम्सना प्रत्येकी 225,000 डॉलर (जवळपास 1.87 कोटी रुपये) मिळणार आहेत. T20 वर्ल्डकपसाठी एकूण 11.25 मिलियन डॉलर (जवळपास 93.51 कोटी रुपये) प्राइज मनी निश्चित करण्यात आली आहे.
विजेत्या संघाला किती कोटी मिळणार?
T20 वर्ल्ड कप 2024 जिंकणाऱ्या टीमला 20.36 कोटी रुपये (2.45 मिलियन डॉलर) मिळणार आहेत. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा विजेत्या टीमला इतकी मोठी रक्कम मिळणार आहे. फायनल हरणाऱ्या टीमला म्हणजे उपविजेत्याला 10.64 कोटी रुपये (1.28 मिलियन डॉलर) मिळणार आहेत.
ICC reveal historic prize money for the Men’s #T20WorldCup 🤩
Details ⬇️https://t.co/jRhdAaIkmc
— ICC (@ICC) June 3, 2024
टी-20 वर्ल्डकप प्राइज मनी
• विजेता : 20.36 कोटी रुपये
• उप-विजेता : 10.64 कोटी रुपये
• सेमीफाइनल : 6.54 कोटी रुपये
दुसऱ्या राऊंडमधून बाहेर होणाऱ्यांना 3.17 कोटी रुपये
• 9 ते 12 व्या स्थानावरील टीम : 2.05 कोटी रुपये
• 13 ते 20 व्या स्थानावरील टीम : 1.87 कोटी रुपये
• पहिला आणि दुसऱ्या राऊंडमधील विजेते : 25.89 लाख रुपये