IND vs IRE: आयर्लंड विरुद्ध दुखापत! ‘हिटमॅन’ पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकणार? कॅप्टन म्हणाला….

Rohit Sharma Injury Update: रोहित शर्माला आयर्लंड विरुद्धच्या सामन्यादरम्यान बॅटिंग करताना दुखापत झाली. रोहितला या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं.

IND vs IRE: आयर्लंड विरुद्ध दुखापत! हिटमॅन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकणार? कॅप्टन म्हणाला....
rohit sharma ind vs ire
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 06, 2024 | 12:36 AM

टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने 97 धावांचं आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने विजयी धावांचा पाठलाग करताना 52 धावांची खेळी केली. त्यानंतर रोहित रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. आयर्लंडचा गोलंदाज जोशुआ लिटील याने टाकलेला बॉल रोहितच्या खांद्याला लागला. त्यामुळे रोहितला मैदानाबाहेर जावं लागलं. रोहितने 37 बॉलमध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या.

रोहितला टीम इंडियाच्या डावातील नवव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर दुखापत झाली. रोहित त्यानंतर काही बॉल खेळला. मात्र त्यानंतर दुखणं असह्य झाल्याने रोहित दहाव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर फिजीओसोबत मैदानाबाहेर गेला. रोहितला काय झालं? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला. मात्र रोहितने सामन्यानंतर आपल्या दुखापतीबाबत पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान माहिती दिली.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“बस साधारण (बाहुला) दुखतंय. आता उद्यापर्यंत बघुयात कसं वाटतंय”,असं रोहितने दुखापतीबाबत सामन्यानंतर म्हटलं. तसेच रोहितने खेळपट्टी आणि सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली. पीचकडून काही मदत होईल हे ठरवणं अनिश्चित होतं. या खेळपट्टीला फक्त 5 महिनेच झाले आहेत. त्यामुळे या खेळपट्टीवर कसं खेळायचं याची माहिती नाही. मला नाही वाटतं की दुसऱ्या डावात आम्ही बॅटिंग केली तेव्हा खेळपट्टी स्थिर झाली होती. गोलंदाजांसाठी फार काही विशेष नव्हतं. या खेळपट्टीने विचार करायला भाग पाडलं”,असं रोहितने खेळपट्टीबाबत म्हटलं.

रोहितच्या दुखापतीबाबत अपडेट

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.