AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 वर्ल्ड कप विजेता, उपविजेता संघ होणार मालामाल, आयसीसीकडून बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा

टी 20 विश्वचषक स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये विजेत्या संघासाठी किती बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे, याची घोषणा आयसीसीने केली आहे.

T20 वर्ल्ड कप विजेता, उपविजेता संघ होणार मालामाल, आयसीसीकडून बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा
टी-20 विश्वचषक
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 8:36 PM
Share

नवी दिल्ली : टी 20 विश्वचषक स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये विजेत्या संघासाठी किती बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे, याची घोषणा आयसीसीने केली आहे. पुरुषांच्या टी -20 विश्वचषक विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन डॉलर्स (जवळपास 12 कोटी रुपये) इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. त्याचवेळी, उपविजेत्या संघाला म्हणजेच अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाला 8 लाख डॉलर्स (जवळपास 6 कोटी रुपये) इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. (ICC T20 World Cup winners to get 1.6 million USD, runner-ups to take home 8 lakhs usd)

इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल (ICC) कडून बक्षीस रकमेबरोबरच हे देखील सांगण्यात आले आहे की, ड्रिंक्स ब्रेकसाठी एका डावात 2 मिनिटे 30 सेकंद दिले जातील. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, सुपर 12 टप्प्यानंतर प्रत्येक विजयासाठी संघाला बोनस पुरस्कारही दिला जाईल. 2016 मध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 विश्वचषकातही असेच झाले होते. सुपर -12 स्टेजवर होणाऱ्या एकूण 30 सामन्यांमध्ये 40 हजार डॉलर्स (सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये) बक्षीस दिले जाईल.

या जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी 4 लाख अमेरिकन डॉलर (सुमारे 3 कोटी रुपये) मिळतील. यावेळी विश्वचषकातील संघांसाठी एकूण 5.6 दशलक्ष डॉलर (सुमारे 42 कोटी रुपये) ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. 70 हजार डॉलर्स (52 लाख रुपये) सुपर 12 स्टेजपर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला दिले जातील. राऊंड लीगच्या 12 सामन्यांच्या दरम्यान, प्रत्येक सामन्यासाठी 40 हजार डॉलर्स दिले जातील. राऊंड-1 मधून बाहेर पडलेल्या चार संघांना 40-40 हजार डॉलर्स (सुमारे 30 लाख रुपये) मिळतील.

बांगलादेश, आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स, पापुआ न्यू गिनी, ओमान, श्रीलंका आणि स्कॉटलंड राउंड 1 मध्ये असतील. दुसरीकडे, भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आधीच सुपर -12 टप्प्यात पोहोचले आहेत.

यंदाचे विश्वचषकात सहभाग घेणारे संघ

इंग्लंड (England) : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सैम बिलिंग्स, जॉस बटलर, सैम करन, क्रिस जॉर्डन, लियम लिविंगस्टन, डेविड मलान, टेमाल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेविड विली, क्रिस वोक्स और मार्क वुड | राखीव: टॉम करन, जेम्स विंस आणि लियाम डॉसन.

बांग्लादेश (Bangladesh) : महमुदुल्लाह (कर्णधार), मोहम्मद नईम, लिटन दास (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, सौम्य सरकार, मुश्फ़िकुर रहीम, अफ़ीफ़ हुसैन, नुरुल हसन, महेदी हसन, नासूम अहमद, मुस्ताफ़िज़ुर रहमान, शोरीफ़ुल इस्लाम, तस्कीन अहमद, मोहम्मद सैफ़ुद्दीन, शमीम हुसैन. राखीव: रुबेल हुसैन, अमीनुल इस्लाम बिप्लब

अफगानिस्तान (Afghanistan) : राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), हजरतुल्लाह जजाई (यष्टीरक्षक), उस्मान गनी, असगर अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हमीद हसन, शरफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शफूर जादरान आणि कैस अहमद.

न्यूझीलंड (New Zealand) : केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवन कॉनवे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जॅमिसन, लॉकी फर्ग्यूसन, मार्क चेपमैन आणि टॉड एस्टल.

भारत (India) : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकुर

पाकिस्तान (Pakistan) : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, आजम खान, हैरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिज़वान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन शाह अफरीदी | राखीव- फखर जमां, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

ऑस्ट्रेलिया (Australia) : एरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मॅथ्यू वेड, स्टीव स्मिथ, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मैक्सवेल, जॉश इंग्लिस, मिचेल मार्श, ऐश्टन ऐगर, पॅट कमिन्स, जॉश हेजलवुड, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, केन रिचर्डसन आणि एडम जाम्पा.

दक्षिण अफ्रीका (South Africa) : टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), बजोर्न फॉर्टयूइन,रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडिन मार्कराम, डेविड मिलर, डब्ल्यू मुल्डर, लुंगी नगिदी, एनरिख नॉर्खिया, ड्वायन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वान डर डुसैन | राखीव: जॉर्जी लिंडे, एंडिले फेहुलक्वायो, लिजाड विलियम्स.

इतर बातम्या

IPL 2021, DC vs CSK : आजच्या सामन्याचा निकाल ‘या’ 5 खेळाडूंच्या हातात

IPL 2021, DC vs CSK Head to Head Records : चेन्नईचे किंग्स भिडणार दिल्लीच्या नवाबांशी, कोण पोहचणार अंतिम सामन्यात?

यंदा चेन्नईला IPL जिंकायचीय?, तर धोनीला करावा लागणार मोठा त्याग, या हुकमी एक्क्यावर दाखवावा लागणार भरोसा

(ICC T20 World Cup winners to get 1.6 million USD, runner-ups to take home 8 lakhs usd)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.