IPL 2021, DC vs CSK : आजच्या सामन्याचा निकाल ‘या’ 5 खेळाडूंच्या हातात

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ रविवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये आमनेसामने येतील. या सामन्यातील विजयी संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. दोन्ही संघ या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

1/6
चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ रविवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये आमनेसामने येतील. या सामन्यातील विजयी संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. दोन्ही संघ या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, कोणता संघी विजयी होणार हे 5 खेळाडूंच्या कामगिरीवरून ठरवले जाईल, जे कोणत्याही वेळी सामन्याचं चित्र बदलू शकतात.

2/6
सीएसके संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्लेऑफमध्ये सर्वात अनुभवी कर्णधार आहे. त्याने 11 प्लेऑफ आणि 8 अंतिम सामने खेळले आहेत. धोनी हा असा खेळाडू आहे, जो त्याच्या नेतृत्वगुणांमुळे सामना फिरवू शकतो.

3/6
क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाची भूमिकाही खूप महत्त्वाची असणार आहे. पहिल्या टप्प्यात नॉर्खिया ​​खेळला नाही, मात्र दुसऱ्या टप्प्यात तो 6 सामन्यात 9 विकेट घेत संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून समोर आला आहे. गोलंदाजीतील वेगाबरोबरच तो महत्त्वाच्या वेळी विकेट घेण्याचेही काम करतो.

4/6
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन हा या मोसमात त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने गेल्या 14 सामन्यांमध्ये 544 धावा केल्या आहेत. संघाला दमदार सुरुवात देण्याची जबाबदारी धवनवर असेल. त्याचा साथीदार पृथ्वी शॉ विशेष फॉर्ममध्ये नाही, त्यामुळे दिल्लीच्या संघाला त्यांच्या सर्वात फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा असतील.

5/6
चेन्नई सुपर किंग्जसाठी त्यांचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने चांगली कामगिरी करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याने आणि फाफ डु प्लेसिस या सलामीच्या जोडीने संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. त्याने लीगमध्ये आतापर्यंत 20 षटकार आणि 56 चौकार फटकावले आहेत. त्याच्या नावावर एक शतकदेखील आहे. अशा परिस्थितीत, संघाला चांगली सुरुवात करुन देण्याची महत्त्वाची जबाबदारी फाफ आणि ऋतुराजच्या खांद्यावर असेल.

6/6
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा चांगला लयीत आहे. तो गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर योगदान देत असतो. जडेजा सध्या फिनिशरची भूमिका बजावतोय आणि गोलंदाज म्हणूनही सामना फिरवण्याची ताकद त्याच्यात आहे. अशा परिस्थितीत चेन्नईला जिंकण्यासाठी जडेजाचा फॉर्म अबाधित राहणे महत्त्वाचे आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI