
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया आपल्या दुसऱ्या सामन्यात नवख्या नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरीच वेळ असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला यूएई टीममध्ये मोठा बदल झाला आहे. आयसीसीने यूएई टीममधील बदली खेळाडूची घोषणा केली आहे. आयसीसीने यूएई टीममध्ये कुणाच्या जागी कुणाला संधी दिलीय? हे जाणून घेऊयात.
यूएई क्रिकेट टीममध्ये मोहम्मद जोहेब याच्या जागी हैदर शाह याचा समावेश करण्यात आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने या बदलासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. नियमांनुसार, ठराविक मुदतीनंतर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात बदल करण्यासाठी आयसीसीच्या तांत्रिक समितीची परवानगी घ्यावी लागते. आयसीसीकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासह बदलासाठी ठराविक मुदत दिली जाते. मुदतीनंतर काहीही बदल करण्यासाठी आयसीसीची पूर्वपरवानगी बंधनकारक असते.
दरम्यान यूएई टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. यूएईचा डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. यूएईला आपल्या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. डी ग्रुपमध्ये यूएई आणि न्यूझीलंड व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि कॅनडाचा समावेश आहे.
विरुद्ध कॅनडा, 13 फेब्रुवारी,
विरुद्ध अफगाणिस्तान, 16 फेब्रुवारी,
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 18 फेब्रुवारी,
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी यूएईचा सुधारित संघ : मोहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, आर्यांश शर्मा, ध्रुव पराशर, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मयंक कुमार, मोहम्मद अरफान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवादुल्लाह, हैदर शाह, रोहिद खान, सोहेब खान आणि सिमरनजीत सिंह.