U19 World Cup 2026 : सेमी फायनलसाठी 4 संघ फिक्स, टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?

ICC Mens U19 World Cup 2026 Semi Finals Team : अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर अखेर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं आहे. जाणून घ्या टीम इंडिया उपांत्य फेरीत कुणाविरुद्ध खेळणार.

U19 World Cup 2026 : सेमी फायनलसाठी 4 संघ फिक्स, टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?
Vaibhav Suryavanshi U19 Team India
Image Credit source: Michael Steele/Getty Images
| Updated on: Feb 01, 2026 | 11:23 PM

टीम इंडियाने रविवारी 1 फेब्रुवारीला सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला संघाचा धुव्वा उडवला. भारताने यासह अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. भारत यासह सेमी फायनलमध्ये पोहचणारा चौथा आणि अखेरचा संघ ठरला. टीम इंडियाआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या 4 संघानी साखळी आणि सुपर 6 फेरीत किती सामने जिंकले? तसेच उपांत्य फेरीत कोणत्या संघासमोर कुणाचं आव्हान असणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंडची साखळी आणि सुपर 6 मधील कामगिरी

इंग्लंड क्रिकेट टीमने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलंय. इंग्लंडने साखळी फेरीतील 3 आणि सुपर 6 मधील 2 असे एकूण आणि सलग 5 सामने जिंकले. इंग्लंडने साखळी फेरीत पाकिस्तान, झिंबाब्वे, आणि स्कटॉलँडला लोळवलं. त्यानंतर इंग्लंडने सुपर 6 मध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंडचा धुव्वा उडवला.

ऑस्ट्रेलियाचा विजयी पंच

ऑस्ट्रेलियानेही इंग्लंड प्रमाणे साखळी फेरीत 3 आणि सुपर 6 मधील 2 असे सर्व आणि एकूण 5 सामने जिंकले. ऑस्ट्रेलियाने आयर्लंड, जपान आणि श्रीलंकेला साखळी फेरीत पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला सुपर 6 मध्ये लोळवलं.

अफगाणिस्तानचा विजयी चौकार

अफगाणिस्तानने साखळी फेरीतील 3 सामने जिंकले. मात्र अफगाणिस्तानला सुपर 6 मधील 2 पैकी एका सामन्यान पराभूत व्हावं लागलं. श्रीलंकेने अफगाणिस्तानवर 4 विकेट्सने मात केली. मात्र अफगाणिस्तानने निर्णायक सामन्यात आयर्लंडवर मात करत उपांत्य फेरीत धडक दिली.

टीम इंडियाने काय केलं?

टीम इंडियाही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया प्रमाणे अजिंक्य राहिली. भारतने साखळी आणि सुपर 6 फेरीत प्रतिस्पर्धी संघाला पराभवाचं पाणी पाजलं. भारताने यूएसए, बांगलादेश आणि न्यूझीलंडवर साखळी फेरीत मात केली. भारताने झिंबाब्वे आणि त्यानंतर आता पाकिस्तानला सुपर 6 मध्ये पराभूत केलं.

टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

उपांत्य फेरीतील सामने केव्हा?

दरम्यान उपांत्य फेरीतील सामन्यांचा थरार हा 3 आणि 4 फेब्रुवारीला रंगणार आहे. ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. तर टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे. तर शुक्रवारी 6 फेब्रुवारीला वर्ल्ड चॅम्पियन कोण असणार? हे अंतिम सामन्यानंतर निश्चित होईल.

उपांत्य फेरीतील सामन्यांचं आव्हान

मंगळवार, 3 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, बुलावायो.

बुधवार,4 फेब्रुवारी, भारत विरुद्ध अफगाणिस्तान, हरारे.

शुक्रवार, 6 फेब्रुवारी, अंतिम सामना, हरारे