ENG vs SA W, Semi Final 2 | इंग्लंडवर 6 धावांनी मात, दक्षिण आफ्रिकेची अंतिम सामन्यात धडक

| Updated on: Feb 24, 2023 | 10:13 PM

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते.मात्र इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 158 धावाच करता आल्या.

ENG vs SA W, Semi Final 2 | इंग्लंडवर 6 धावांनी मात, दक्षिण आफ्रिकेची अंतिम सामन्यात धडक
Follow us on

मुंबई | आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 6 धावांनी विजय झाला आहे. साऊथ आफ्रिकेने विजयााठी 165 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 158 धावाच करता आल्या. आफ्रिकेने या विजयासह पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता या वर्ल्ड कपसाठीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना रविवारी 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर 6 वाजता टॉस होणार आहे.

इंग्लंडची बॅटिंग

इंग्लंडकडून नॅट क्विवर ब्रंट हीने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. कॅप्टन हिथर नाईटने 31 धावांचं योगदान दिलं. ओपनर डॅनियले व्याटने 34 धावा केल्या. तर सोफिया डंकले 28 रन्स करुन माघारी परतली. मात्र या चौघींचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही आणि इथेच सामना फिरला.

इंग्लंडची आश्वासक सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी सोफिया आणि डॅनियले या दोघींनी 53 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मात्र इंग्लंडने 53 धावांवर 2 विकेट्स गमावले. त्यानंतर इंग्लंडने छोटेखानी पार्टनरशीप केल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेने ठराविक अंतराने विकेट्स घेतल्याने इंग्लंडचं अंतिम सामन्यात पोहचण्याचं स्वप्न भंगलं.

हे सुद्धा वाचा

दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगाा खाका हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शबनिम इस्माईल हीने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नादिन डी क्लर्क हीने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

साऊथ आफ्रिकेची बॅटिंग

दरम्यान त्याआधी दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 164 धावा केल्या.लॉरा वोलवार्ड्ट आणि ताझमीन ब्रिट्स सलामी जोडीनं 75 धावांची भागीदारी केली. सावध खेळीमुळे इंग्लंडचे गोलंदाज पुरते हतबळ दिसून आले.

वर्ल्ड कप कोण जिंकणार?

दरम्यान आता वर्ल्ड कपसाठी अंतिम सामना हा आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलिया टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी टीम आहे. ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये पोहचण्याची 7 वी तर आफ्रिकेची पहिलीच वेळ आहे. तसेच
ऑस्ट्रेलिया 2020 च्या वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे आता या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका मातब्बर ऑस्ट्रेलियाला पराभूत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होणार, की ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिकंणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन | लॉरा वोलवार्ड्ट, ताझमीन ब्रिट्स, मॅरिझेन कप्प, अन्नेके बॉश, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता, शबनिम इस्माईल, अयाबोंगाा खाका आणि नोन्कुलुलेको म्लाबा.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | डॅनियले व्याट, सोफिया डंकले, एलिस कॅपसे, नॅट क्विवर ब्रंट, हिथर नाईट, एमी जोन्स, सोफि एक्सलस्टोन, कॅथरिन क्विवर ब्रंट, साराह ग्लेन, चार्ली डीन आणि लॉरेन बेल.