ICC Women T20 वर्ल्डकप जेतेपदाचं स्वप्न महिला पूर्ण करणार! अंतिम फेरीत द. आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा काटा काढणार?

आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियानं भारताला पाच धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. आता दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा 6 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

ICC Women T20 वर्ल्डकप जेतेपदाचं स्वप्न महिला पूर्ण करणार! अंतिम फेरीत द. आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा काटा काढणार?
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 9:59 PM

मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियानं भारताला पाच धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. आता दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा 6 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे पुरुष संघाला जे शक्य झालं नाही ते महिला संघ तरी करणार का? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी करत आहेत.या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. तर दक्षिण आफ्रिकेनं साखळी फेरीत दोन सामने गमावले आहे. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी आणि 21 राखून पराभव केला होता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. तर वर्ल्डकप इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीचा सामना 26 फेब्रुवारी 2023 रोजी, भारतीय वेळेनुसारी संध्याकाळी 6.30 वाजता असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका साखळी फेरीतील निकाल

साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढत झाली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 गडी गमवून 124 धावा केल्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 16 षटकं आणि 3 चेंडूत पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी आमि 21 चेंडू राखून पराभव केला होता.

टी20 वर्ल्डकपमध्ये या संघांनी जेतेपदावर कोरलं नाव

  • 2009 इंग्लंड (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड), इंग्लंडने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
  • 2010 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड) ऑस्ट्रेलियाने 3 धावांनी हा सामना जिंकला.
  • 2012 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी हा सामना जिंकला.
  • 2014 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून हा सामना जिंकला.
  • 2016 वेस्ट इंडिज (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज) वेस्ट इंडिजने 8 गडी राखून सामना जिंकला.
  • 2018 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून हा सामना जिंकला.
  • 2020 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत) ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी हा सामना जिंकला.

दक्षिण आफ्रिकन संघ- अन्नेरी डेर्कसन, लारा गुडाल, लॉरा व्होलवार्ट, अन्नेके बॉच, च्लोई ट्रायोन, डेलमारी टकर, मॅरिजेन कॅप्प, नदीन डि क्लर्क, सुने लूस (कर्णधार), सिनालो जाफ्ता, टाझमिन ब्रिट्स, अयाबोंगा खाका, मासबाटा क्लास, नोन्कुलुलेको म्लाबा, शबनिम इस्माईल

ऑस्ट्रेलियन संघ- बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम, मेगन स्कूट

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.