
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या वूमन्स टीम इंडियाने स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली. यजमान टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग 2 सामने जिंकले. मात्र त्यानंतर ज्याची भीती होती तसंच झालं. भारताला सलग 2 विजयानंतर सलग 2 पराभवांचा सामना करावा लागला. भारताची या 2 पराभवांमुळे गाडी विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली. भारताचं या 2 पराभवांमुळे उपांत्य फेरीतील समीकरण हे अटीतटीचं झालं आहे. भारताला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी उर्वरित 3 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं असेल? तसेच टीम इंडियाला कोणती चूक सुधारावी लागेल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. उर्वरित सामने आणि समीकरण आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धा राउंड रॉबिन फॉर्मेटने खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी आहेत. प्रत्येक संघ इतर संघांविरुद्ध प्रत्येकी 1 असे एकूण 7...