AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs SA Live Streaming | ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात काँटे की टक्कर, सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

Australia vs South Africa Live Streaming | 5 वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया टीमची आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये 1992 नंतर पहिल्यांदा पराभवाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे कांगारु दक्षिण आफ्रिका विरुद्ध विजयाच्या तयारीने उतरणार आहेत.

AUS vs SA Live Streaming | ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात काँटे की टक्कर, सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
| Updated on: Oct 12, 2023 | 12:20 AM
Share

लखनऊ | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 10 वा सामना हा 12 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमेनसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलंय. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिकेचं कर्णधारपद आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत.

ऑस्ट्रेलियाची यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमधील सुरुवात पराभवाने झाली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. तर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 7 ऑक्टोबर रोजी 102 धावांनी विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिका ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया सातव्या क्रमाकांवर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विजयी घोडदौड कायम राखण्याच्या प्रयत्न करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा विजयी खातं उघडण्याचा प्रयत्न असेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. विविध भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना कॉमेंट्रीचा आनंद घेता येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर फुकटात पाहता येईल. मात्र त्यासाठी क्रिकेट चाहत्यांना डिज्नी प्लस हॉटस्टार हा एप डाऊनलोड करावा लागेल.

ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, विल्यम ड्युसेन आणि लीडर वॅन्सी .

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.