
पुणे | टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपला चौथा सामना खेळत आहे. बांगलादेशने टीम इंडया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. साधारण दुखापतीमुळे बांगलादेशने आपला नियमित कर्णधार बदलला आहे. शाकिब अल हसन याच्या जागी नजमुल हुसैन शांतो याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे नजमुल आपल्या नेतृत्वात टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल. तर दुसऱ्या बाजूला पुणेकरांकडून फुल्ल सपोर्ट आहे, अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
टीम इंडिया-बांगलादेश सामन्याच्या तिकीटाचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पकडलं आहे. अव्वाच्या सव्वा भावात तिकीटाची विक्री करणाऱ्या दोघांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे. पिंपरी च्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने या दोघांना जाळ्यात अडकवलं आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत सर्वसामन्य चाहत्यांची तिकीट मिळत नसल्याची तक्रार आहे. भारतात 12 वर्षांनी वर्ल्ड कप होत असल्याने चाहते स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे तिकीटाची मारामार आहे.
आयसीसीकडून तिकीटाची ऑनलाईन सोय करण्यात आली आहे. मात्र तिथेही तिकीट सहज उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे क्रिकेट चाहते दुप्पत तिप्पट रक्कम मोजून ब्लॅकने तिकीट घेत आहेत. पुण्यात स्टेडियमबाहेर रवी लिंगप्पा देवकर आणि अजित सुरेश कदम हे दोघे ब्लॅकने तिकीट विकत होते. या दोघांकडे 1200 रुपयांची 5 तिकीटं होती. हे एक तिकीट 12 हजार च्या दराने विकत होते. पोलिसांना माहिती मिळताच या दोघांचा करेक्ट कार्यक्रम केला. पोलिसांनी या दोघांकडून 1 हजार 200 रुपयांची 5 तिकीट आणि 51 हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास, तंझिद हसन, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.