
मुंबई | आयसीसी एकदिवसीय विश्व चषकाला 5 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. यंदा आयसीसी वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे आहे. वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सलामीचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तर 1 दिवसआधी रंगारंग कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेत एकूण 45 दिवस 48 सामने होणार आहेत. देशातील 10 स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
या पहिल्या सामन्याआधी सर्व भारतीय क्रिकेट चाहते एकच प्रश्न विचारत आहेत. वर्ल्ड कप टीममध्ये सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोघापैंकी कुणाला संधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ही चर्चा आता इतकी रंगली की यावर टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री यांनी सूर्या आणि श्रेयस या दोघापैंकी कुणाला पसंती दिलीय, जाणून घेऊयात.
सूर्यकुमार यादव हा टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर आहे, असं शास्त्री यांनी म्हटलंय.”मी सुर्याला जवळून पारखेन, कारण टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली, तर तुमच्याकडे 6-7-8 खेळाडू आहेत. यावेळेस सूर्याला किंवा श्रेयसला खेळवाल. मात्र सर्वच फलंदाज धावा करत असतील तर तो एक्स फॅक्टर ठरतो. तो सामना जिंकून देऊ शकतो.”, असं शास्त्री एका कार्यकर्मात म्हणाले.
दरम्यान टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत ऐन वेळेस आर अश्विन याला 15 खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे. अक्षर पटेल याच्या जागी अश्विनला टीममध्ये घेतलंय. अक्षरला आशिया कप 2023 मध्ये दुखापत झाली होती. अक्षरला याच दुखापतीमुळे आशिया कप फायनलला मुकावं लागलं होतं.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.