Prithvi Shaw : मुंबईत पृथ्वी शॉ बसलेल्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?

Attack on Prithvi Shaw car : मुंबईत पृथ्वी शॉ वर हल्ला झाला आहे. सुदैवाने पृथ्वी शॉ या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. पृथ्वी शॉ पूर्णपणे सुरक्षित आहे. पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमध्ये बसला होता.

Prithvi Shaw : मुंबईत पृथ्वी शॉ बसलेल्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?
पृथ्वी शॉ
Image Credit source: पृथ्वी शॉ इंस्ट्राग्राम
| Updated on: Feb 16, 2023 | 2:05 PM

Attack on Prithvi Shaw car : मुंबईत पृथ्वी शॉ वर हल्ला झाला आहे. सुदैवाने पृथ्वी शॉ या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. पृथ्वी शॉ पूर्णपणे सुरक्षित आहे. पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमध्ये बसला होता. त्यावेळी काही लोकांना पृथ्वी शॉ सोबत सेल्फी घ्यायचा होता. पृथ्वीसोबत सेल्फी घेण्यासाठी हे लोक त्याच्यामागे लागले होते. पण शॉ ने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास नकार दिला. पृथ्वी शॉ चा नकार काही लोकांना सहन झाला नाही. ते पृथ्वीवर भडकले. त्यांनी पृथ्वी बसलेल्या कारवर दगडफेक सुरु केली. पृथ्वी शॉ च्या मित्राच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

खेळापेक्षा इतर घटनांमुळे चर्चेत

भारतीय बॅट्समन पृथ्वी शॉ मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खेळापेक्षा इतर घटनांमुळे पृथ्वी शॉ जास्त चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी व्हॅलेंटाइन्स डे ला त्याचा एडिट केलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यावर शॉ समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं.


अभिनेत्रीसोबतच्या फोटोवरुन वाद

14 फेब्रुवारीला पृथ्वी शॉ च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्री निधी तपाडियासोबतचा एक फोटो शेअर करण्यात आला. निधीचा पृथ्वीने पत्नी असा उल्लेख केला. काही मिनिटात त्याने हा फोटो डिलीट केला. कोणीतरी आपला फोटो एडिट केलाय, असं पृथ्वी शॉ ने स्पष्टीकरण देताना सांगितलं. इन्स्टाग्रामवर पोस्ट न केलेल्या गोष्टी दाखवल्या जातायत असं त्याने सांगितंल. अशा कुठल्याही गोष्टी सत्य मानू नका, असं त्याने लोकांना आवाहन केलं.

कधीपासून रिलेशनशिपची चर्चा

मागच्या बऱ्याच काळापासून पृथ्वी शॉ च निधीसोबत नाव जोडलं जातय. काही दिवसांपूर्वी निधीने एक फोटो पोस्ट केला होता. मित्र मला लैला म्हणतो असं निधीने म्हटलं होतं. त्यावर हा मित्र कोण आहे? असं पृथ्वीने विचारलं. त्याने रागात असल्याचा एक इमोजी पोस्ट केला. सोशल मीडियावर दोघांच्या या चर्चेनंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली..