AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 विजयानंतर बीसीसीआयने दिलेल्या 131 कोटींची वाटणी कशी होणार? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. बीसीसीआयने खूश होत टीम इंडियाला 131 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. आता टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला किती रक्कम मिळेल? ते जाणून घ्या.

T20 World Cup 2026 विजयानंतर बीसीसीआयने दिलेल्या 131 कोटींची वाटणी कशी होणार? जाणून घ्या
T20 World Cup 2026 विजयानंतर बीसीसीआयने 131 कोटींची वाटणी कशी होणार? जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 11, 2026 | 3:46 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताने तिसऱ्या जेतेपद मिळवलं आहे. या विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी खजिना खुला केला आहे. बीसीसीआयने टीम इंडिया विजयी होताच 131 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्यामुळे या पैशांची वाटणी कशी होणार? वगैरे प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले होते. रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर संघातील 15 खेळाडूंना प्रत्येकी 6 कोटींची रक्कम मिळणार आहे. म्हणजेच खेळाडूंमध्ये एकूण 90 कोटी वाटले जाणार आहेत.

टीम इंडियातील खेळाडूंना 90 कोटींची रक्कम वितरीत झाल्यानंतर उर्वरित 41 कोटींची रक्कम सपोर्ट स्टाफमध्ये वाटली जाणार आहे. यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचाही आहे. तसेच बॅटिंग कोच सितांशु कोटक, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्काथे, गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मोर्केल, फिल्डिंग कोच टी दिलीप यांचा समावेश आहे. यासह थ्रो डाउन स्पेशालिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडिशन कोचस टीम डॉक्टर या सर्वांना हे बक्षीस मिळणार आहे. टीमच्या सपोर्ट स्टाफमधील किती जण आहेत याचा अंदाज नाही. तरी प्रत्येक सदस्याला 2 ते 3 कोटी रूपये मिळू शकतात.

टीम इंडियाने गेल्या काही वर्षात आयसीसी ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळाला आहे. 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयने 125 कोटी दिले होते. यात आता 6 कोटींची वाढ केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर 58 कोटींची रक्कम दिली होती. आता टीम इंडियाचं लक्ष आता वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेकडे आहे. असं असलं तरी भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब जिंकावा असाही एक वर्ग आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटला चांगले दिवस येतील असंही तज्ज्ञ सांगत आहेत. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टॉप 2 मध्ये टीम इंडिया स्थान मिळवेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन