AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वास्ते गुना हुईया’ ते ‘डेलुलू’..! Gen Z पोरांच्या अतरंगी डिक्शनरीने अख्खा सोशल मीडिया केलाय ‘शुक’

आजकालच्या 'जनरेशन झेड' (Gen Z) म्हणजेच नव्या इंटरनेट पिढीची बोलण्याची शैली पूर्णपणे बदलली आहे. सोशल मीडियावर स्क्रोल करताना किंवा कॉलेज कट्ट्यावर मुलांशी बोलताना अनेकदा 'इक', 'रिझ' किंवा 'नो कॅप' असे भन्नाट शॉर्टकट शब्द कानावर पडतात. जर तुम्हाला या आधुनिक डिजिटल भाषेचा नेमका अर्थ समजत नसेल, तर काळजी करू नका; आम्ही तो सोप्या मराठीत कसा वापरायचा हे स्पष्ट केले आहे.

'वास्ते गुना हुईया' ते 'डेलुलू'..! Gen Z पोरांच्या अतरंगी डिक्शनरीने अख्खा सोशल मीडिया केलाय 'शुक'
'वास्ते गुना हुईया' ते 'डेलुलू'..! Gen Z पोरांच्या अतरंगी डिक्शनरीने अख्खा सोशल मीडिया केलाय 'शुक'Image Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: Jul 29, 2026 | 9:01 PM
Share

सोशल मीडियाच्या रिल्समधून जन्माला आलेली तरुणाईची ही नवी ‘स्लँग डिक्शनरी’ सध्या डिजिटल जगतावर राज्य करत आहे. ‘वास्ते गुना हुईया’ सारख्या निरर्थक पण मजेशीर मीमपासून ते ‘डेलुलू’ पर्यंत अनेक अतरंगी शब्द मुलांच्या रोजच्या संवादाचा भाग बनले आहेत. या बातमीच्या माध्यमातून तुम्ही या अतरंगी शब्दांचा योग्य उच्चार आणि त्यांचा संवादात कसा वापर करावा, हे सहज शिकू शकता.

1) इंटरनेटवर धुमाकूळ घालणारे मुख्य ट्रेंडिंग शब्द

Vaaste Guina Huiya (उच्चार: वास्ते गुना हुईया): याचा शाब्दिक अर्थ नाही. हा एक अतिशय मजेशीर, निरर्थक (Nonsense) शब्द आहे, जो केवळ सोशल मीडियावर समोरच्या व्यक्तीला गोंधळात टाकण्यासाठी किंवा गंमत म्हणून मोठ्याने ओरडून वापरला जातो.

वापर/उदाहरण: सगळे परीक्षेच्या कठीण प्रश्नांवर खूप गंभीरपणे चर्चा करत होते, तेवढ्यात एका मित्राने मोठ्याने विचारले—”अंकल, वास्ते गुना हुईया?” आणि गंभीर वातावरणाचे हसण्यात रूपांतर झाले.

Ick (उच्चार: इक): एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे किंवा सवयीमुळे अचानक मनात निर्माण होणारी तीव्र घृणा किंवा तिरस्कार.

वापर/उदाहरण: “तो दिसायला खूप छान होता, पण जेवताना चमचा वाडग्यावर खूप जोरात आपटत आवाज करत होता; त्याचा हा प्रकार पाहून मला लगेच इक आला आणि मी तिथून निघून गेले.”

Poki / Poke (उच्चार: पोकी / पोक): डिजिटल जगात (फेसबुक/इंस्टाग्राम) समोरच्याचे लक्ष वेधण्यासाठी मारलेली डिजिटल टपली किंवा उंगली करणे.

वापर/उदाहरण: “तीने दोन दिवसांपासून रिप्लाय दिला नाही, म्हणून मी तिला पोक केले.”

Rizz (उच्चार: रिझ): करिष्मा (Charisma). एखाद्याला आपल्या बोलण्याने, स्टाईलने किंवा फ्लर्टिंगने आकर्षित करण्याची उपजत क्षमता.

वापर/उदाहरण: “त्याला मुलींशी कसे बोलायचे हे वेगळे सांगायला लागत नाही, त्याचा रिझ एवढा भारी आहे की कॉलेजमध्ये सगळे त्याचे फॅन आहेत.”

No Cap (उच्चार: नो कॅप): खोटं न बोलता, अगदी शपथेवर खरे सांगणे (नो लाय / खरंच).

वापर/उदाहरण: “मी काल रात्री पाहिलेला चित्रपट एवढा थ्रिलर होता की मला मध्यरात्री झोपच आली नाही, नो कॅप!”

2) नातेसंबंध आणि भावना व्यक्त करणारे शब्द

Situationship (उच्चार: सिच्युएशनशिप): मैत्रीपेक्षा जास्त पण अधिकृत नात्यापेक्षा कमी असलेली, अनिश्चित नात्याची स्थिती.

वापर/उदाहरण: “ते दोघे अजूनही सिच्युएशनशिप मध्येच अडकले आहेत, लग्न कधी करणार माहीत नाही.”

Ghosting (उच्चार: घोस्टिंग): कोणत्याही कारणाशिवाय किंवा न सांगता समोरच्या व्यक्तीशी असलेले सर्व संपर्क (मॅसेज, कॉल) अचानक पूर्णपणे तोडून टाकणे.

वापर/उदाहरण: “दोन महिने डेट केल्यानंतर त्याने तिला अचानक घोस्ट केले.”

Simp (उच्चार: सिम्प): आपल्या क्रशला किंवा आवडत्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी तिच्या मागे-मागे करणे आणि स्वतःचा स्वाभिमान विसरणे.

वापर/उदाहरण: “तो तिच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करतो, पूर्ण सिम्प आहे तो.”

Breadcrumbing (उच्चार: ब्रेडक्रंबिंग): नात्यात पूर्णपणे वचन न देता, समोरच्याला फक्त आशेवर ठेवण्यासाठी मेसेज किंवा थोडे लक्ष देणे. वापर/उदाहरण: “तो रिलेशनशिपसाठी गंभीर नाही, तो फक्त ब्रेडक्रंबिंग करतोय.”

Soft Launch (उच्चार: सॉफ्ट लाँच): सोशल मीडियावर आपल्या पार्टनरचा चेहरा न दाखवता फक्त हात किंवा सावली दाखवून रिलेशनशिप गुपचूप जाहीर करणे.

वापर/उदाहरण: “तीने तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो न टाकता फक्त हाताचा फोटो टाकत सॉफ्ट लाँच केले.”

Hard Launch (उच्चार: हार्ड लाँच): सोशल मीडियावर पार्टनरसोबतचा स्पष्ट फोटो किंवा व्हिडिओ टाकून थेट रिलेशनशिप अधिकृतपणे जाहीर करणे.

वापर/उदाहरण: “त्यांनी थेट लग्नाचा एकत्र फोटो टाकून सोशल मीडियावर हार्ड लाँच केले.”

Love Bombing (उच्चार: लव्ह बॉम्बिंग): नात्याच्या सुरुवातीला समोरच्या व्यक्तीवर प्रमाणाबाहेर प्रेम, भेटवस्तू आणि कौतुकाचा वर्षाव करणे, जे नंतर त्रासदायक ठरू शकते.

वापर/उदाहरण: “सुरुवातीला तो खूप लव्ह बॉम्बिंग करत होता, पण आता तो फोनही उचलत नाही.”

Gaslighting (उच्चार: गॅसलायटिंग): समोरच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या असे भासवणे की तिची स्वतःची स्मरणशक्ती चुकीची आहे, म्हणजेच स्वतःच्या फायद्यासाठी दिशाभूल करणे.

वापर/उदाहरण: “चूक स्वतःची असूनही तो मलाच दोषी ठरवतोय, हा निव्वळ गॅसलायटिंग चा प्रकार आहे.”

Main Character Energy (उच्चार: मेन कॅरेक्टर एनर्जी): स्वतःला एखाद्या सिनेमाच्या मुख्य हिरो किंवा हिरोईनसारखे समजून अत्यंत आत्मविश्वासाने जगणे.

वापर/उदाहरण: “ती जेव्हा नवीन कपडे घालून चालते, तेव्हा तिच्यामध्ये वेगळीच मेन कॅरेक्टर एनर्जी दिसते.”

Cuffing Season (उच्चार: कफिंग सीजन): हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत जोडीदार शोधण्याची आणि नात्यात येण्याची तरुणांची मानसिकता.

वापर/उदाहरण: “थंडी सुरू झाली की कॉलेजमध्ये मुलांचा कफिंग सीजन सुरू होतो.”

३) स्टाईल, कौतुक आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित शब्द

Slay (उच्चार: स्ले): एखादे काम, कपडे किंवा स्टाईल अत्यंत उत्कृष्ट, कमाल आणि प्रभावी पातळीवर करणे.

वापर/उदाहरण: “आजच्या साडिंगच्या लूकवर ती पूर्णपणे स्ले करत आहे.”

Aura (उच्चार: ऑरा): एखाद्या व्यक्तीचा समाजात असलेला रुबाब, स्वॅग, प्रभाव किंवा तिची ऊर्जा.

वापर/उदाहरण: “रोहित शर्मा जेव्हा मैदानावर येतो, तेव्हा त्याचा ऑरा वरच्या पातळीवर असतो.”

Glow Up (उच्चार: ग्लो अप): व्यक्तीच्या लूक, मानसिक स्थितीत किंवा आयुष्यात झालेला अत्यंत सकारात्मक, सुंदर आणि मोठा बदल. वापर/उदाहरण: “कॉलेज संपल्यानंतर त्याच्या लूक आणि हुशारीमध्ये खूप मोठा ग्लो अप झाला आहे.”

Aesthetic (उच्चार: एस्थेटिक): दिसायला खूप सुंदर, सुव्यवस्थित, कलात्मक आणि डोळ्यांना शांतता देणारे लूक किंवा डिझाईन. वापर/उदाहरण: “या नवीन कॅफेचे इंटीरियर खूप एस्थेटिक आहे, फोटो मस्त येतात.”

Boujee (उच्चार: बुजी): खूप श्रीमंती थाट असलेला, ब्रँडेड किंवा उच्चभ्रू जीवनशैली आवडणारा. वापर/उदाहरण: “तिची कपड्यांची आणि गाड्यांची निवड नेहमीच खूप बुजी असते.”

Snack (उच्चार: स्नॅक): एखादी व्यक्ती दिसायला अत्यंत आकर्षक किंवा हॉट असणे. वापर/उदाहरण: “नवीन हेअरकट केल्यानंतर तो अगदी स्नॅक सारखा दिसतोय.”

Serving (उच्चार: सर्व्हिंग): एखादा लूक किंवा फॅशन अत्यंत उत्तम रीतीने लोकांसमोर सादर करणे. वापर/उदाहरण: “ती रेड कारपेटवर फॅशनच्या बाबतीत उत्तम लूक सर्व्हिंग करत आहे.”

Drip (उच्चार: ड्रिप): अत्यंत स्टायलिश कपडे किंवा फॅशन सेन्स असणे (कपड्यांचा स्वॅग). वापर/उदाहरण: “त्याच्या नवीन जॅकेट आणि शूजचा ड्रिप कमाल आहे.”

Guark (उच्चार: ग्वार्क): एखाद्या गोष्टीची अतिप्रमाणात स्तुती करणे किंवा दिखावा करणे. वापर/उदाहरण: “तो त्याच्या साध्या मोबाईलचे उगाचच ग्वार्क करत असतो.”

Fit (उच्चार: फिट): ‘आउटफिट’ (Outfit) म्हणजेच कपड्यांचा पूर्ण संच या शब्दाचा शॉर्टकट. वापर/उदाहरण: “आजच्या पार्टीसाठी तुझा फिट खूप भारी निवडलायस.”

4) मानसिक स्थिती आणि वागण्याचे प्रकार

Delulu (उच्चार: डेलुलू): वास्तवाशी काहीही संबंध नसलेल्या काल्पनिक विश्वात किंवा भ्रमात जगणे (डिल्युशनल असणे). वापर/उदाहरण: “तो विचार करतोय की त्याने कॉलेजमध्ये कधीच पाय ठेवला नाही तरी त्याला थेट ५ लाख रुपयांची नोकरी मिळेल, तो पूर्णपणे डेलुलू आहे.”

Rent Free (उच्चार: रेंट फ्री): एखादी गोष्ट किंवा व्यक्ती मनातून सतत बाहेर न पडणे, डोक्यात चोवीस तास फिरत राहणे. (वापर/उदाहरण: “त्या नव्या गाण्याची ट्यून माझ्या डोक्यात रेंट फ्री फिरत आहे.”)

Living for it (उच्चार: लिविंग फॉर इट): एखाद्या गोष्टीवर खूप जास्त प्रेम करणे किंवा तिचे अत्यंत कौतुक करणे. (वापर/उदाहरण: “शाहरुखच्या नवीन सिनेमाच्या ट्रेलरसाठी मी लिव्हिंग फॉर इट आहे.”)

Vibe Check (उच्चार: व्हायब चेक): समोरील वातावरण किंवा व्यक्तीची मानसिक स्थिती आणि ऊर्जा आपल्याशी जुळते की नाही हे तपासून पाहणे. (वापर/उदाहरण: “नवीन मित्रांसोबत आमचा व्हायब चेक एकदम परफेक्ट झाला.”) Salty (उच्चार: सॉल्टी): एखाद्या गोष्टीमुळे चिडचिड होणे, अपमानास्पद वाटणे किंवा उगाचच नाराजी व्यक्त करणे. (वापर/उदाहरण: “मॅच हरल्यामुळे कॅप्टन पत्रकारांशी बोलताना पूर्णपणे सॉल्टी झाला होता.”)

Guilty Pleasure (उच्चार: गिल्टी प्लेझर): अशी गोष्ट जी करायला लाज वाटते पण ती करायला प्रचंड आवडते. (वापर/उदाहरण: “रात्री जेवल्यानंतर जुनी सुमार गाणी गुपचूप ऐकणे हे माझे गिल्टी प्लेझर आहे.”)

FOMO (उच्चार: फोमो): ‘फियर ऑफ मिसिंग आऊट’ (Fear of Missing Out). आपण एखाद्या ट्रिप किंवा पार्टीला गेलो नाही तर बाकीचे मजा करतील, अशी वाटणारी भीती. (वापर/उदाहरण: “सगळे मित्र गोव्याला गेलेत, मला घरी बसून भारी फोमो येतोय.”)

JOMO (उच्चार: जोमो): ‘जॉय ऑफ मिसिंग आऊट’ (Joy of Missing Out). गर्दीपासून लांब राहून एकट्याने स्वतःच्या घरात शांततेत राहण्याचा आनंद घेणे. (वापर/उदाहरण: “शनिवारी रात्री पार्टीला न जाता घरी पुस्तक वाचत बसण्याचा आनंद म्हणजे जोमो.”)

Brain Rot (उच्चार: ब्रेन रॉट): सोशल मीडियावर तासनतास निरर्थक रील्स आणि मीम्स पाहून मेंदू सुन्न किंवा थकल्यासारखा होणे. (वापर/उदाहरण: “३ तास सलग रील्स पाहून माझा पूर्ण ब्रेन रॉट झाला आहे.”)

Main Character (उच्चार: मेन कॅरेक्टर): स्वतःला अतिमहत्त्वाचे समजणारा आणि जगाचे लक्ष वेधून घेणारा व्यक्ती. (वापर/उदाहरण: “तो पोरगा स्वतःला वर्गाचा मेन कॅरेक्टर समजतो.”)

5) प्रतिक्रिया आणि सोशल मीडिया शॉर्टकट

Sus (उच्चार: सस): एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर संशय येणे (सस्पिशिअस – Suspicious या शब्दाचा शॉर्टकट). (वापर/उदाहरण: “त्याची नवी सोशल मीडिया स्टोरी खूप सस वाटतेय, नक्कीच काहीतरी गडबड आहे.”)

Clout (उच्चार: क्लाऊट): सोशल मीडियावर प्रसिद्धी, नाव, फॉलोअर्स किंवा पॉवर मिळवण्यासाठी केलेली धडपड. (वापर/उदाहरण: “तो फक्त क्लाऊट मिळवण्यासाठी लोकांच्या व्हिडिओवर वादग्रस्त कमेंट्स करत असतो.”)

Periodt (उच्चार: पिरियडट): वाक्याच्या शेवटी भर देण्यासाठी वापरला जाणारा शब्द; “माझे बोलणे संपले, आता यावर कोणतीही चर्चा नको.” (वापर/उदाहरण: “मला हा चित्रपट अजिबात आवडला नाही, पिरियडट!”)

Shook (उच्चार: शुक): एखादी गोष्ट पाहून अत्यंत आश्चर्यचकित होणे किंवा धक्का बसणे. (वापर/उदाहरण: “स्टंटमॅनचा तो खतरनाक अपघात पाहून मी पूर्ण शुक झालो.”)

Understood the assignment (उच्चार: अंडरस्टुड द असाइनमेंट): ज्याला जे काम दिले होते, त्याने ते अगदी शंभर टक्के अचूक आणि उत्तम प्रकारे पार पाडणे. (वापर/उदाहरण: “या गाण्यात डान्सरने डान्स करताना गाण्याचा मूड ओळखून अंडरस्टुड द असाइनमेंट सारखं काम केलंय.”)

Tea (उच्चार: टी): सोशल मीडियाच्या भाषेत ‘टी’ म्हणजे चहा नाही, तर कोणाबद्दलची तरी गुपिते किंवा “मसालेदार गॉसिप” (Gossip). (वापर/उदाहरण: “आज कॉलेजमध्ये काय नवीन घडलं? काही टी आहे का तुझ्याकडे?”)

Spill the tea (उच्चार: स्पिल द टी): कोणाबद्दलचे तरी लपलेले गुपित किंवा मसालेदार बातमी उघड करणे. (वापर/उदाहरण: “चल लवकर त्यांच्या ब्रेकअप बद्दल स्पिल द टी कर.”)

Based (उच्चार: बेस्ड): कोणाचीही पर्वा न करता स्वतःचे मत ठामपणे मांडणारा व्यक्ती. (वापर/उदाहरण: “तो कोणालाही न घाबरता खरे बोलला, त्याचे मत अत्यंत बेस्ड होते.”)

W (उच्चार: डब्लू): ‘विन’ (Win) म्हणजेच विजय किंवा यश मिळवणे. (वापर/उदाहरण: “आज भारताने मॅच जिंकली, कमेंट बॉक्समध्ये फक्त W लिहित आहेत.”)

L (उच्चार: एल): ‘लॉस’ (Loss) म्हणजेच अपयश येणे किंवा गेम हरणे. (वापर/उदाहरण: “परीक्षा खराब गेल्यामुळे आज मला भारी L मिळाला.”)

6) दैनंदिन आयुष्य आणि इतर महत्त्वाचे शब्द

Gatekeeping (उच्चार: गेटकिपिंग): एखादी चांगली गोष्ट (जसे की छान रेस्टॉरंट, स्वस्त दुकान किंवा गाणे) इतरांना कळू नये म्हणून लपवून ठेवणे. (वापर/उदाहरण: “तू इतक्या छान कपड्यांच्या दुकानाचे नाव मित्रांपासून गेटकिप का करतोयस?”)

Era (उच्चार: एरा): एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील विशिष्ट काळ किंवा फेज (उदा. सिंगल एरा, जिम एरा). (वापर/उदाहरण: “मी सध्या कोणाशीही फालतू गप्पा मारत नाही, मी माझ्या अभ्यासाच्या एरा मध्ये आहे.”)

BFFR (उच्चार: बीएफएफआर): ‘बी फॉर रिअल’ (Be For Real). म्हणजे “जरा भानावर ये” किंवा “गंभीर व्हा जरा” या अर्थाने. (वापर/उदाहरण: “तू उद्या सकाळी ५ वाजता उठून पळायला जाणार आहेस? बीएफएफआर!”)

Hits different (उच्चार: हिट्स… डिफरंट): एखाद्या गोष्टीची मजा इतर सामान्य गोष्टींपेक्षा खूप वेगळी आणि भारी असणे. (वापर/उदाहरण: “आईच्या हातचा गरम स्वयंपाक खाण्याची मजा हिट्स डिफरंट!”)

Lowkey (उच्चार: लो-की): एखादी गोष्ट मनापासून हवी असणे पण ती जाहीर न करणे (गुप्तपणे आवडणे). (वापर/उदाहरण: “मला लो-की वाटतंय की आपण सर्वांनी एकत्र फिरायला जावं.”)

Highkey (उच्चार: हाय-की): एखादी गोष्ट स्पष्टपणे, मोठ्या आवाजात आणि सर्वांसमोर मान्य करणे. (वापर/उदाहरण: “मला हाय-की हे मान्य करावं लागेल की तुझा डान्स भारी होता.”)

Snatched (उच्चार: स्नॅच्ड): एखादी फॅशन किंवा लूक अगदी परफेक्ट आणि टोकदार असणे. (वापर/उदाहरण: “तिचा आजचा साडीतला लूक एकदम स्नॅच्ड आहे.”)

Valid (उच्चार: वॅलिड): एखादी गोष्ट किंवा मत पटण्यासारखे असणे. (वापर/उदाहरण: “शिक्षकांनी दिलेल्या कारणावर तिचे मत एकदम वॅलिड होते.”)

Savage (उच्चार: सॅव्हेज): कोणाचीही पर्वा न करता अत्यंत धारदार, सडेतोड आणि आक्रमक उत्तर देणे. (वापर/उदाहरण: “त्याने ट्रोलर्सला दिलेले उत्तर अत्यंत सॅव्हेज होते.”)

Basic (उच्चार: बेसिक): ज्याला स्वतःची वेगळी स्टाईल नाही, जो फक्त चालू ट्रेंड डोळे बंद करून फॉलो करतो असा सामान्य व्यक्ती. (वापर/उदाहरण: “ती फक्त बाजारात जे मिळतं तेच घालते, तिचा फॅशन सेन्स खूप बेसिक आहे.”)

Goated (उच्चार: गोटेड): ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (GOAT). आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणारा. (वापर/उदाहरण: “सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या विश्वात कायम गोटेड राहील.”)

Chef’s kiss (उच्चार: शेफ्स किस): एखादी गोष्ट इतकी उत्कृष्ट असणे की त्यासाठी बोटांनी चुंबन घेऊन दाद द्यावीशी वाटणे. (वापर/उदाहरण: “तिने बनवलेली बिर्याणी चवीला एकदम शेफ्स किस होती.”)

Ratioed (उच्चार: रेशोअड): सोशल मीडियावर मूळ पोस्टपेक्षा तिच्या खाली आलेल्या विरोधी कमेंट्स आणि लाईक्सची संख्या जास्त असणे (पोस्ट फ्लॉप जाणे). (वापर/उदाहरण: “नेत्याने केलेल्या वादग्रस्त विधानाचा ट्विट पूर्णपणे रेशोअड झाला.”)

Cancel Culture (उच्चार: कॅन्सल कल्चर): सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीने चुकीचे वर्तन केल्यास त्याचे अकाउंट अनफॉलो करून त्याला पूर्णपणे वाळीत टाकणे. (वापर/उदाहरण: “त्या वादग्रस्त विधानानंतर युट्युबरवर सोशल मीडियाने कॅन्सल कल्चर चालवले आहे.”)

Stan (उच्चार: स्टॅन): एखाद्या सेलिब्रिटीचा किंवा कलाकाराचा अतिप्रमाणात वेडा किंवा कट्टर चाहता असणे. (वापर/उदाहरण: “ती लहानपणापासूनच त्या कोरियन बँडची मोठी स्टॅन आहे.”)

Touch Grass (उच्चार: टच ग्रास): फोनवर खूप वेळ बसणाऱ्याला “बाहेर पड, निसर्गात जा आणि वास्तव जग अनुभव” असा सल्ला देणे. (वापर/उदाहरण: “दिवसभर गेम खेळू नकोस, कधीतरी बाहेर जाऊन टच ग्रास कर.”)

नव्या पिढीसोबत राहण्यासाठी, त्यांचे मीम्स समजण्यासाठी आणि त्यांच्याशी नीट संवाद साधण्यासाठी ही शब्दांची डिक्शनरी नक्कीच फायदेशीर ठरेल.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग