T20 World Cup 2021 मध्ये बाबर आजम ON FIRE, ठोकलं तिसरं अर्धशतक, वर्ल्ड रेकॉर्डही धोक्यात

| Updated on: Nov 07, 2021 | 10:35 PM

पाकिस्तानचा क्रिकेट संघ सलग पाच सामन्यात विजयांनी सेमीफायनलमध्ये पोहोचला असून याचं सर्वाधिक श्रेय कर्णधार बाबर आजमला जातं.

T20 World Cup 2021 मध्ये बाबर आजम ON FIRE, ठोकलं तिसरं अर्धशतक, वर्ल्ड रेकॉर्डही धोक्यात
बाबर आजम
Follow us on

T20 World Cup 2021: यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमची (Babar Azam) बॅट अक्षरश: आग ओकत आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यातही अर्धशतक ठोकत बाबरने स्पर्धेतील चौथं तर सलग तिसरं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने या सामन्यात 47 चेंडूत 66 धावांची तुफानी फलंदाजी केली. याआधी भारताविरुद्ध 68 धावा केल्यानंतर बाबर न्यूझीलंडविरुद्ध 9 धावा करुन बाद झाला होता. पण नंतर  51, 70 आणि आता 66 धावांची खेळी करत बाबरनं अप्रतिम कामगिरी सुरुच ठेवली आहे.

बाबर आजम चार अर्धशतकांसह टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये सर्वाधिक धावा लगावणारा फलंदाज झाला आहे. बाबरने  5 सामन्यात 66 च्या सरासरीने 264 धावा पूर्ण केल्या आहेत. बाबरने बटलरला (240) मागे टाकले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या या खेळीमुळे तो एका वर्ल्ड रेकॉर्डच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तो पुढच्याच सामन्यात हा रेकॉर्ड पूर्ण करु शकतो.

विश्वचषकात सर्वाधिक धावा

बाबर आजम टी20 वर्ल्ड कपमध्ये एक नवा रेकॉर्ड करणार असून त्याचा पहिलाच टी20 वर्ल्ड कप असताना त्याने 264 धावा केल्या आहेत. दरम्यान सलामीच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियात्या मॅथ्यू हेडनच्या नावावर आहे. त्याने 2007 च्या विश्वचषकात 265 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता आणखी दोन धावा करताच बाबर हा रेकॉर्ड तोडून टाकू शकतो. बालर पाठोपाठ पाकच्या मोहम्मद रिजवाननेही 5 सामन्यात 70 हून अधिक सरासरीने 214 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा

Special Report: जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू, श्रीमंत क्रिकेट बोर्ड, तरी विश्वचषकातून भारत बाहेर, नेमकी माशी कुठे शिंकली?

न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 सीरीजमध्ये आयपीएलमधील ‘या’ 5 युवांचे तारे चमकणार, BCCI देणार संधी!

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी, गोलंदाजी प्रशिक्षक खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज, म्हणाले…

(In pakistan vs scotland match babar azam hits half century hes near to break mathew haydens record of most runs in world cup)