न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 सीरीजमध्ये आयपीएलमधील ‘या’ 5 युवांचे तारे चमकणार, BCCI देणार संधी!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 07, 2021 | 5:21 PM

इकडे 14 नोव्हेंबरला T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता घोषित होईल आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करेल. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे.

Nov 07, 2021 | 5:21 PM
विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्वात पहिलाच दौरा असणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध टी20 मालिकेत संघनिवड करताना भारतीय संघ व्यवस्थापन कोणाला स्थान देणार? हे गुलदस्त्यात असलं तरी काही नावं ही चर्चेतून सतत समोर येत आहेत.

1 / 6
आयपीएल गाजवणाऱ्या 5 खेळाडूंची नावं समोर येत असून यातील पहिलं नाव म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 16 सामन्यात  24 विकेट्स घेतले. त्यामुळे सर्व निवडकर्त्यांची नजर त्याच्यावर असणार हे नक्की!

2 / 6
तसंच अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आलेला केकेआरचा वेंकटेश अय्यर हाही संघात असण्याची दाट शक्यता आहे. त्याने आयपीएलमध्ये 10 सामन्यात  370 करत विकेट्सही मिळवल्या आहेत.

3 / 6
केकेआर संघाचाच आणखी एक खेळाडू ज्याचं नाव न्यूझीलंड मालिकेत असून शकतं तो म्हणजे राहुल त्रिपाठी. त्याने यंदाच्या च आय़पीएलमध्ये 17 सामन्यात 397 रन्स केले आहेत.

4 / 6
या सर्वांसोबत यंदाची आय़पीएल गोलंदाजीने गाजवणारा हर्षल पटेलही संघात नक्कीच असू शकतो. त्याने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. त्याने 15 सामन्यात 32 विकेट्स मिळवल्या.

5 / 6
या सर्वानंतर सर्वात कमी सामने खेळलेला काश्मीरचा उम्रान मलिक यालाही संधी मिळू शकते. कारण काहीच सामने खेळलेल्या उम्रानने दुसऱ्याच सामन्यात पर्वातील सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांना प्रभावित केलं होतं. त्यामुळे निवडकर्तेही त्याला प्रभावित होऊन संधी देऊ शकतात.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI