एका दिवसात तब्बल 24 विकेट्स, अवघ्या दोन दिवसात भारताचा ऐतिहासिक विजय, 119 वर्षांनी मोठा रेकॉर्ड

भारतीय क्रिकेट संघाने एका धडाकेबाज विजयाची नोंद आजच्याच दिवशी केली होती. या विजयात अनेक ऐतिहासिक बाबींची नोंद झाली.

एका दिवसात तब्बल 24 विकेट्स, अवघ्या दोन दिवसात भारताचा ऐतिहासिक विजय, 119 वर्षांनी मोठा रेकॉर्ड
भारत आणि अफगानिस्तान सामन्यांतील एक क्षण
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jun 15, 2021 | 1:23 PM

बंगळुरु : भारत आणि अफगानिस्‍तान क्रिकेट संघात (India vs Afghanistan) आजच्याच दिवशी म्हणजे 15 जून रोजी 2018 मध्ये एक कसोटी मॅच खेळवली गेली. सामन्याआधीच भारतीय संघ विजयी होईल अशी चर्चा होती. पण एका दमदार आणि ऐतिहासिक विजयाची नोंद भारतीय संघ करेल असा कोणी विचारही केला नव्हता. सामन्यात अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड झाले. ज्यात एका दिवसात 24 विकेट्स पडल्या, पाच दिवसांचा सामना दोन दिवसांत संपला अशा काही गोष्टींचा समावेश होतो. विशेष म्हणजे असा सामना 119 वर्षांपूर्वी झाला होता. (In Test Match India beat Afghanistan in just two days At bengaluru in 2018)

सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार होता अजिंक्‍य रहाणे (Ajinkya Rahane). सामन्यात भारताने पहिली फलंदाजी करत 474 धावांता डोंगर उभा केला. मुरली विजय (Murli Vijay) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी सलामीला येत दोघांनी शतक लगावले. टीम इंडियाचा पहिला विकेट 168 रनांवर पडला. शिखर धवन 96 चेंडूत 19 चौकार आणि 3 षटकार खेचत 107 धावा करुन बाद झाला. विशेष म्हणजे धवन कसोटी सामन्यांत लंच ब्रेकआधी शतक लगावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्यानंतर मुरली विजयने 153 चेंडूत 103 धावा केल्या. के एल राहुलने (K L Rahul) 54, पुजाराने (Pujara) 35 आणि हार्दिक पांड्याने (Hardik Pandya)71 धावा करत भारताला सामन्यांत मजबूत स्थान मिळवून दिलं.

109 आणि 103 धावांवर अफगानिस्‍तानचा संघ ढेपाळला

भारताच्या अप्रतिम सुरुवातीनंतरही अफगानिस्‍तानने 474 धावांत भारताला रोखलं. पण भारताची ही धावसंख्या अफगानिस्‍तानच्या दोन्ही डावांसाठी पुरेशी होती. अफगानिस्‍तानचा पहिला डाव 27.5 ओव्हरमध्ये 109 धावा करुन संपला. रवीचंद्रन अश्विनने (R Ashwin) चार, इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) प्रत्येकी दोन विकेट्स घेत अफगानिस्तानला ऑलआऊट केले. मोहम्‍मद नबीने (Mohammad nabi) सर्वाधिक 24 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 38.4 ओव्हरमध्ये केवळ 103 धावा करुन अफगानिस्तान पुन्हा एकदा ऑलआऊट झाला. हशमतुल्‍लाह शाहिदीने नाबाद 36 धावा केल्या. या डावांत भारताकडून जाडेजाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. उमेश यादवनेही तीन विकेट्स मिळवल्या. अफगानिस्तान दोन्ही डावात मिळूनही खास कामगिरी करु शकला नसल्याने भारताने तब्बल 262 धावांनी सामना नावे केला. एका दिवसांत 24 विकेट्स पडण्याचा कारनामा तब्बल 119 वर्षानंतर घडला होता. 1902 मध्ये याआधी अशाप्रकारे एका दिवसात 24 गडी बाद झाले होते.

हे ही वाचा :

अबब! ‘या’ सामन्यात लागली 10 ‘शतकं’, धावांचा डोंगर, कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येपैकी एक

WTC Final : विजयी संघ होणार मालामाल, ICC च्या मानाच्या गदेसह मिळणार कोट्यावधी रुपये

WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?

(In Test Match India beat Afghanistan in just two days At bengaluru in 2018)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें