AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs AFGA : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान रोखणार?

India A vs Afghanistan A Preview : टीम इंडियाने यजमान श्रीलंकेवर सनसनाटी विजय मिळवला होता. त्यानंतर आता टीम इंडिया अफगाणिस्तानला अस्मान दाखवण्यासाठी सज्ज आहे.

INDA vs AFGA : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान रोखणार?
Tilak Varma and Rutujraj Gaikwad India AImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 11, 2026 | 1:02 PM
Share

इंडिया ए टीम ट्राय नॅशन सीरिज 2026 मालिकेत आपला सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाने तिलक वर्मा याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेला पराभूत करुन विजयी सलामी दिली. त्यानंतर आता टीम इंडिया अफगाणिस्तान ए टीम विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडिया या सामन्यात सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी उतरणार आहे. तर अफगाणिस्तानचा आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र टीम इंडिया अफगाणिस्तानवर वरचढ आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा भारतासमोर चांगलाच कस लागणार आहे. मात्र त्यानंतरही अफगाणिस्तान टीम इंडिया विरुद्ध कसा लढा देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष

अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. वैभवला ट्राय सीरिजमधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध काही खास करता आलं नव्हतं. वैभवला श्रीलंकेविरुद्ध ठिकठाक सुरुवात तर मिळाली होती. मात्र वैभव त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरला होता. वैभवने 12 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या होत्या. त्यामुळे वैभव अफगाणिस्तान विरुद्ध किती मोठी खेळी करतो याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

ऋतुराज सलग दुसरं शतक ठोकणार?

उपकर्णधार ऋतुराज गायकवाड श्रीलंकेविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. ऋतुराजने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावलं होतं. ऋतुराजच्या खेळीमुळे भारताला 277 धावांपर्यंत मजल मारता आली होती. ऋतुराजने 101 धावा केल्या होत्या. ऋतुराजचं लिस्ट ए क्रिकेटमधील 21 वं शतक ठरलं होतं. त्यामुळे आता ऋतुराजला सलग दुसरं शतक करण्याची संधी आहे. तसेच ऋतुराजला शतक करुन गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्या लिस्ट ए क्रिकेटमधील 21 शतकांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. त्यामुळे चाहत्यांना ऋतुराजकडून सलग दुसऱ्या शतकाची आशा असणार आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार 11 जून रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. तसेच सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे मॅच लाईव्ह पाहता येईल.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार