
नवी दिल्ली | अफगाणिस्तानने कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझई या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 272 धावा केल्या. हशमतुल्लाह शाहिदी याने सर्वाधिक 80 आणि अझमतुल्लाह ओमरझई याने 62 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेत अफगाणिस्तानला 270 आधी रोखण्यात यश मिळवलं.
अफगाणिस्तानने टीम इंडिया विरुद्ध आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील नवव्या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या अफगाणिस्तानला टीम इंडियाने झटपट 3 झटके दिले. त्यामुळे अफगाणिस्तानची 3 बाद 63 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझई या दोघांनी अफगाणिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानला संजीवनी दिली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली. त्यानंतर या दोघांनी फटकेबाजी सुरुच ठेवली.
हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझई जोडी सेट झाल्याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढली होती. मात्र हार्दिक पंड्या याने ही जोडी फोडली. हार्दिकने अझमतुल्लाह ओमरझई याला 62 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर कुलदीप यादव याने हशमतुल्लाह शाहिदी याला 80 धावांवर एलबीडब्लयू केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह याने गेमचेंजिग ओव्हर टाकून अफगाणिस्तानला बॅकफुटवर ढकललं.
टीम इंडियासमोर 273 धावांचं आव्हान
🎯 Set!
After opting to bat first, #AfghanAtalan have put 272/8 runs on the board, with major contributions coming from the skipper @Hashmat_50 (80) and the all-rounder @AzmatOmarzay (62). 👏
Over to our bowlers now…! #CWC23 | #AFGvIND | #WarzaMaidanGata pic.twitter.com/pSMA8aYFsr
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 11, 2023
बुमराहने नजीबुल झद्रान आणि मोहम्मद नबी या दोघांनी मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर त्यानंतर फटकेबाजी करणाऱ्या राशिद खान याला बुमराहने रोखलं. बुमराहने राशिदला 16 धावांवर कुलदीप यादव याच्या हाती कॅच आऊट केलं. टीम इंडियाकडून बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या याला 2 विकेट्स घेण्यात यश आलं. तर शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादव या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.