AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यादरम्यान स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे सीरिजला आजपासून सुरुवात झाली. मात्र या दरम्यान टीमचा माजी कर्णधार राहिलेल्या खेळाडूने निवृत्ती घेतली.

IND vs AUS | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यादरम्यान स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
| Updated on: Mar 17, 2023 | 3:25 PM
Share

मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव केला. त्यानंतर आजपासून (17 मार्च) उभय संघातील 3 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र कडकडीत असूनही क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र दुसऱ्या बाजूला स्टार क्रिकेटरने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. माजी कर्णधार राहिलेल्या या खेळाडूने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा माजी कर्णधार राहिलेल्या टीम पेन याने शुक्रवारी निवृत्ती जाहीर केली आहे. शेफील्ड शील्ड स्पर्धेत तस्मानिया विरुद्ध क्वीसलँड यांच्यात प्रथम श्रेणी सामना खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला. यानंतर पेन याने प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. यानतंर पेन याला खेळाडूंनी गॉर्ड ऑफ ऑनर दिला.

टीम पेन याने आपल्या कसोटी कारकीर्दीत 35 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. या दरम्यान पेन याने 2018 ते 2021 या दरम्यान एकूण 23 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्वही केलं. मात्र दक्षिण आफ्रिका विरुद्ध 2018 साली चेंडूसह छेडछाड केल्याने स्टीव्ह स्मिथ याला कर्णधारपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर पेन याला कर्णधार करण्यात आलं. यासह पेन ऑस्ट्रेलियाचा 46 वा कर्णधार ठरला. मात्र 2021 मध्ये पेनने एका वादात अडकल्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तस्मानियाच्या एका माजी कर्णधाराला वादग्रस्त मेसेज करण्याचा वाद वाढला होता. त्यानंतर पेन याने हा निर्णय घेतला होता.

टीम पेन याने 2010 साली पाकिस्तान विरुद्ध क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केलं होतं. टीमच्या या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत त्याने 32.63 च्या सरासरीने धावा केल्या. पेनचा 92 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. शिवाय पेनने 35 वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं.

प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द

पेन याने आपल्या 154 प्रथम श्रेणी सामने खेळला. यात त्याने 6 हजार 490 धावा केल्या. या दरम्यान त्याने 3 शतकं आणि 35 अर्धशतकं ठोकली. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 8 शतकांच्या मदतीने 3 हजार 971 धावा केल्या.

पहिल्या वनडेसाठी दोन्ही संघ

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस, कॅमरुन ग्रीन,ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.