AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | टीम इंडियाच्या गोलंदाजाचा भेदक मारा, ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

भारतीय क्रिकेट टीमच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जोरदार कमॅबक केलं. भारतीय गोलंदाजांनी घातक बॉलिंग टाकत ऑस्ट्रेलियाला 36 ओव्हरआधीच ऑलआऊट केलं. टीम इंडियाच्या मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या दोघांनी कमाल केली.

IND vs AUS | टीम इंडियाच्या गोलंदाजाचा भेदक मारा, ऑस्ट्रेलिया ऑलआऊट
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 17, 2023 | 5:11 PM
Share

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या सामन्यात जोरदार कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरच्या सामन्यात 36 ओव्हरही खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती पत्कारली. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या 4 विकेट्स या 4 धावांमध्येच गमावल्या. ऑस्ट्रेलियाने ऑलआऊट 188 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 189 धावांचं आव्हान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक 81 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच पहिला झटका दिला. ट्रॅव्हिस हेड याला मोहम्मद सिराज याने बोल्ड केलं. त्यानंतर मिचेल मार्श आणि कॅप्टन स्टीव्हन स्मिथ या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकुदुखी ठरत होती. तेवढ्यात कॅप्टन हार्दिक पंड्याने याने स्टीव्हनचा काटा काढला. सेट झालेला स्टीव्हन 22 रन्स करुन माघारी परतला.

यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. तिसऱ्या विकेटसाठी मिचेल मार्श याने लाबुशेनसह 52 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र मिचेल याला रविंद्र जडेजाने आपल्या बॉलिंगवर मोहम्मद सिराज याच्या हाती कॅच आऊट केलं. मार्शने 65 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. मिचेल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 3 बाद 129 अशी स्थिती झाली होती.

मार्शनंतर जोश इंग्लिस मैदानात आला. जोश आणि मार्नल लाबुशेन हे डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 10 धावा जोडल्या. मात्र यानंतर रविंद्र जडेजा याने कुलदीप यादव याच्या बॉलिंगवर शानदार कॅच घेत मार्नस लाबुशेन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. लाबुशेन याने 15 धावांचं योगदान दिलं.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 4 बाद 139 अशी स्थिती झाली. एकावेळी मजबूत स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बॅकफूटवर ढकललं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी मुसंडी मारत कांगारुंना मैदानात टिकूच दिलं नाही. एका बाजूने शमी आणि सिराज कांगारुंना रडवत होते. तर दुसऱ्या बाजूने रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडीही चांगली बॉलिंग टाकत होते.

चौथ्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. कांगारुंनी शेवटच्या 6 विकेट्स या 49 धावांच्या मोबदल्यात तर शेवटच्या 4 विकेट्स या 4 धावांच्या आतच गमावल्या. शमी आणि सिराज या दोघांव्यतिरिक्त रविंद्र जडेजा याने 2, कुलदीप यादव याने 1 आणि कॅप्टन हार्दिक याने 1 विकेट घेतली.

पहिल्या वनडेसाठी दोन्ही संघ

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस, कॅमरुन ग्रीन,ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!