AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS ODI : वानखेडेवरील वनडे मॅचला जय शाह उपस्थित राहणार?

IND vs AUS ODI : येत्या 17 मार्चपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला वनडे सामना होणार आहे. कसोटी मालिकेत टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं.

IND vs AUS ODI : वानखेडेवरील वनडे मॅचला जय शाह उपस्थित राहणार?
Amol kale jay shah
| Updated on: Mar 14, 2023 | 11:55 AM
Share

मुंबई : बॉर्डर-गावस्कर सीरीज कालच संपली. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला. अहमदाबाद येथे सीरीजमधला शेवटचा सामना खेळला गेला. ही टेस्ट मॅच ड्रॉ झाली. त्याआधी इंदोर कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. एका कसोटीचा अपवाद वगळता या सीरीजमध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. आता सगळ्यांच लक्ष वनडे सीरीजवर लागलं आहे. येत्या 17 मार्चपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला वनडे सामना होणार आहे.

पहिल्या वनडे मॅचआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अमोल काळे यांनी आज अहमदाबाद येथे भारतीय क्रिकेट मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना 17 मार्चला मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिलं.

वानखेडेची खेळपट्टी कशी असेल ?

कसोटी मालिकेप्रमाणे टीम इंडियाने वनडे सीरीजमध्येही वर्चस्व गाजवावं अशी तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. कसोटी मालिकेत खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती. त्यामुळे पहिले तीन कसोटी सामने तीन दिवसात निकाली निघाले. आता वनडे मालिकेत खेळपट्टी कशी असेल? याची उत्सुक्ता आहे. वनडेत हार्दिक पंड्याकडे कॅप्टनशिप

वानखेडेची खेळपट्टी नेहमीच स्पोर्टिंग राहिली आहे. या विकेटवर फलंदाज आणि गोलंदाज दोघांना समान संधी राहिली आहे. टीम इंडिया वानखेडेवर कुठल्या प्लेइंग इलेव्हनसह उतरणार याची उत्सुक्ता आहे. वनडेमध्ये पहिल्यांदाच हार्दिक पंड्या नेतृत्व करणार आहे. हार्दिक पंड्या टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन आहे. रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे पहिल्या वनडे सामन्याला उपस्थित नसेल, त्यावेळी नेतृत्वाची धुरा हार्दिकच्या खांद्यावर असणार आहे.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.