AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 1st Odi | टीम इंडियाचे 5 खेळाडू ऑस्ट्रेलियाचा वाजवणार बाजा, कोण आहेत ते?

INDIA vs AUSTRALIA 1st Odi | वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियासाठीही ही एकदिवसीय मालिका महत्त्वपूर्ण असणार आहे. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या 5 जणांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

IND vs AUS 1st Odi | टीम इंडियाचे 5 खेळाडू ऑस्ट्रेलियाचा वाजवणार बाजा, कोण आहेत ते?
| Updated on: Sep 21, 2023 | 10:17 PM
Share

मोहाली | वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या या मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या 2 मॅचमध्ये टीम इंडियाच्या 5 खेळाडूंवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध फार मोठी जबाबदारी असणार आहे. ते 5 खेळाडू कोण आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

श्रेयस अय्यर, कॅप्टन केएल राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या पाच जणांवर मोठी जबाबदारी असणार आहे. केएल राहुल याच्याकडे बॅटिंग, विकेटकीपिंग आणि कॅप्टन्सी अशी तिहेरी जबाबदारी आहे. श्रेयस अय्यर याला वर्ल्ड कपआधी आपली कामगिरी दाखवण्याचा दबाव असेल. आर अश्विन 20 महिन्यांनी वनडेत कमबॅक करतोय.जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हो दोघे टीम इंडियाच्या बॉलिंगचा कणा आहेत.

या 5 जणांची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. केएल-श्रेयस यांच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. तर सिराज आणि बुमराह या दोघांवर ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासून झटके देण्याची जबाबदारी असेल. तर दुसऱ्या बाजूला अश्विनकडून बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे हे 5 जण कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचंच लक्ष असेल.

पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.