AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS – नागपूरच्या विकेटवर काहीही होऊ शकतं, गुजरात-विदर्भ सामन्यात अनपेक्षित घडलं, सर्वांसाठीच धक्कादायक

IND vs AUS - ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज नेहमीच रोमांचक ठरली आहे. त्यामुळे ही टेस्ट सीरीज कमालीची रोमहर्षक होईल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे. नागपूरमध्ये पहिल्या कसोटीपासून टेस्ट सीरीजची सुरुवात होईल.

IND vs AUS - नागपूरच्या विकेटवर काहीही होऊ शकतं, गुजरात-विदर्भ सामन्यात अनपेक्षित घडलं, सर्वांसाठीच धक्कादायक
ind vs aus test seriesImage Credit source: Getty Images
| Updated on: Jan 20, 2023 | 12:57 PM
Share

नागपूर – भारत आणि ऑस्ट्रेलियातील कोट्यवधी क्रिकेट चाहते 9 फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहतायत. कारण या दिवसापासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची सीरीज सुरु होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज नेहमीच रोमांचक ठरली आहे. त्यामुळे ही टेस्ट सीरीज कमालीची रोमहर्षक होईल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे. नागपूरमध्ये पहिल्या कसोटीपासून टेस्ट सीरीजची सुरुवात होईल. सामने भारतात होतायत, त्यामुले पीच स्पिनर्सना अनुकूल असेल, असा सगळ्यांचा अंदाज आहे. दोन्ही टीम्स त्याच दृष्टीने तयारी करतायत. पण या मॅचच्या 21 दिवस आधी जे घडलय, त्याने भारतासह ऑस्ट्रेलियाच टेन्शन नक्कीच वाढवल असेल.

या मैदानात असं काय घडलं?

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. विदर्भ क्रिकेट टीमच हे घरच मैदान आहे. आपल्या घरच्या मैदानावर विदर्भाने 19 जानेवारीला सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा विजय मिळवला.  विदर्भाने फक्त 18 धावांनी सामना जिंकला. विदर्भाने गुजरातसमोर विजयसाठी फक्त 73 धावांच टार्गेट ठेवलं होतं. पण गुजरातची टीम अवघ्या 54 रन्सवर ऑलआऊट झाली. विदर्भाच्या स्पिनर्सनी या मॅचमध्ये कमाल केली.

ऑस्ट्रेलियावर भारतीय स्पिनर्सचा धाक

विदर्भाच्या या मैदानात भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. त्याने 6 डावात 23 विकेट काढल्यात. त्याशिवाय रवींद्र जाडेजा आणि हरभजन सिंह या स्पिनर्सनी इथे सरस कामगिरी केलीय. सहाजिकच 9 फेब्रुवारीला दोन्ही टीम्स मैदानात उतरतील, तेव्हा टीममध्ये कमीत कमी 3 स्पिनर्सना संधी देतील.

अश्विन आणि जाडेजा इथला रेकॉर्ड पाहता या दोघांपासून ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त धोका असेल. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोन डावखुऱ्या गोलंदाजांपैकी कोणाला संधी मिळाल्यास ते जास्त अडचण वाढवतील. ऑस्ट्रेलियन बॉलरचा कहर

2008 साली पहिल्या कसोटी सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीम आमने-सामने होत्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियन स्पिनर जेसन क्रेजाने 12 विकेट घेऊन खळबळ उडवून दिली होती. यावेळी ऑस्ट्रेलिया नॅथन लायनसह काही स्पिनर्सना घेऊन मैदानात उतरणार आहे.

Follow Us
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?