IND vs AUS 1st ODI : विराट कोहलीची जागा कोण घेणार? ‘या’ युवा खेळाडूला लॉटरी

आगामी वर्ल्डकप आधी खेळवली जाणारी वन डे मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.

IND vs AUS 1st ODI : विराट कोहलीची जागा कोण घेणार? 'या' युवा खेळाडूला लॉटरी
कुलदीप यादव याने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तिचं सोनं केलं आहे. आशिया कपमध्ये तर कुलदीप संघासाठी हुकमी एक्का ठरला आहे. कुलदीप याने दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाच्या विकेट्स घेत विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 9:36 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 आधी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS ODI) वन डे मालिका होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीमधील स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये मुख्य खेळाडूंना विश्रांती देणार असल्याची माहिती समजत आहे. एक नाहीतर पहिल्या दोन सामन्यांमध्ये कोहलीच्या जागेवर कोणता खेळाडू घेणार याबाबत एक नाव समोर आलंं आहे. कोहलीची जागा घेणारा हा खेळाडू कोण आहे ते जाणून घ्या.

आगामी वर्ल्डकप आधी खेळवली जाणारी वन डे मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची सूत्र रोहित ऐवजी के. एल. राहुल याच्या गळ्यात पडणार आहे. सामन्यामध्ये  विराटची जागा युवा खेळाडूकडे देण्यात येणार आहे.

रोहित शर्मा याच्या जागी ईशान किशन याच्याकडे दिली जाणार आहेत. त्यानंतर के.एल. राहुल चार नंबरला खेळताना दिसला होता. जर श्रेयस अय्यर फिट असेल तर राहुल पाचव्या क्रमांकावर खेळेल. नाहीतर सूर्यकुमार यादव आणि दुसरा तिलक वर्मा हे विराटच्या जागी बॅटींगला उतरू शकतात.

विराटच्या जागी तिलक वर्मा याच्याआधी सूर्यकुमार यादव याच्या करिअरकडे पाहतात. आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने त्याने एकूण 537 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा एकूण स्ट्राइक रेट 99.81 होता. तिथेच. टी-20 इंटरनॅशनलमध्ये सूर्याने 53 सामन्यांमध्ये 172.70 च्या तुफानी स्ट्राइक रेटने 1841 धावा केल्या आहेत.

पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.

Non Stop LIVE Update
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.