Video : ind vs aus 2nd ODI | आर. अश्विनसमोर वॉर्नरचा ‘अल्टी-पल्टी’ खेळ, मग काय अण्णाने काढला काटा
या सामन्यामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आणि भारताचा स्टार बॉलर स्पिनर रविचंद्रन अश्विन यांच्यातील एक युद्ध दिसत आहे. ज्यामध्ये शेवटला अश्विनने विजय मिळवला.
मुंबई : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे. या सामन्यामध्ये भारताच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत केलं. या सामन्यामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आणि भारताचा स्टार बॉलर स्पिनर रविचंद्रन अश्विन यांच्यातील एक युद्ध दिसत आहे. ज्यामध्ये शेवटला अश्विनने विजय मिळवला.
पाहा व्हिडीओ :-
Ashwin – The GOAT is back.pic.twitter.com/yOiDAT2266
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2023
डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात 39 बॉल मध्ये 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, यामध्ये त्याने 7 चौकार आणि1 षटकार मारला. वॉर्नर सेट झाल्यासारखा मैदानात चहु दिशेला खेळत होता मात्र त्याने एक चूक केली ती म्हणजे आर अश्विनला रायटीने चौकार मारला. अश्विनलाही ही गोष्ट चांगलीच लागली आणि त्यानेही बदला घ्यायचा ठरवत तो पूर्णही केला. आर आश्विनने डेव्हिड वॉर्नरने असाच बॉल मारताना एलबीडब्ल्यू आऊट करत त्याला तंबूचा मार्ग दाखवला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून अश्विनने जोश इंग्लिस यालाही आऊट करत सलग दोन धक्के दिले. या कामगिरीसह अश्विनने आपली वर्ल्ड कप मधील जागा आणखी बळकट केली.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W/C), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (C), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (W), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन