
इंदूर | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मोहालीत 5 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 277 धावांचं आव्हान टीम इंडियाने 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव या तिघांनी अर्धशतक ठोकलं. तर कॅप्टन केएल राहुल याने 58 धावांची नाबाद खेळी साकारली. त्याआधी मोहम्मद शमी याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला 276 वर रोखण्यात यश आलं. टीम इंडियाने या विजयासह 3 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली.
आता या मालिकेतील दुसरा सामना हा रविवारी 24 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका विजयाची संधी आहे. साधारणपणे विजयी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. मात्र पहिल्या सामन्यात 2 मुंबईकर खेळाडूंनी सपशेल निराशा केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले जाण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 मुंबईकरांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. यामध्ये श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर या दोघांचा समावेश असू शकतो. श्रेयस अय्यर याने आशिया कपनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेतून कमबॅक केलं. दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयसकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध चमकदार खेळीची अपेक्षा होती. पण श्रेयसने निराशा केली. श्रेयस 3 धावांवर रन आऊट झाला. श्रेयसने पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून सर्वात कमी धावा केल्या.
तर शार्दुल ठाकूर यानेही घोर निराशा केली. शार्दुलने टीम इंडियाकडून सर्वात जास्त धावा लुटवल्या. शार्दुलने 10 ओव्हरमध्ये 7.80 च्या इकॉनॉमी रेटने 78 धावा दिल्या. शार्दुलला या बदल्यात 1 विकेटही घेता आल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्या वनडेतून श्रेयस आणि शार्दुल या दोघांना डच्चू दिला जाऊ शकतो. तर श्रेयसच्या जागी युवा तिलक वर्मा आणि शार्दुलच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याला संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.
केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.