IND vs AUS 3rd ODi : अरे काय शुबमन, बॉल पाहिला हातात आला तरी त्याने कॅच सोडला

| Updated on: Mar 22, 2023 | 5:11 PM

कांगारूनी सावध सुरूवात केली होती कारण पहिली विकेट मिळवायला भारताला 11 व्या ओव्हरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. मात्र ही विकेट त्याच ओव्हरमध्ये मिळाली असती मात्र शुबमन गिलने कॅच सोडला.

IND vs AUS 3rd ODi : अरे काय शुबमन, बॉल पाहिला हातात आला तरी त्याने कॅच सोडला
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा आणि निर्णायक सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये युवा खेळाडू शुबमन गिल याने मोठी चूक केली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय. कांगारूंनी सावध सुरूवात केली होती. कारण पहिली विकेट मिळवायला भारताला 11 व्या ओव्हरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. मात्र ही विकेट त्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर मिळाली असती मात्र गिलने कॅच सोडला.

ऑस्ट्रेलियाने 10.5 षटकांत पहिली विकेट गमावली, त्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शुबमन गिलने ट्राव्हिस हेडला जीवदान दिले. हार्दिक पांड्याच्या चेंडूवर गिलने सीमारेषेजवळ झेल सोडला आणि चौकारही दिला. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या हे दोघेही गिलच्या चुकीवर खूप नाराज दिसले. असा झेल कसा सोडला जाऊ शकतो हे रोहितलाही समजत नव्हते, तर हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.

 

ट्राव्हिस हेड त्याच ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर बाद झाला मात्र जर त्याने मोठी खेळी केली असती तर याचा संघाला मोठा फटका बसला असता. दुसऱ्या सामन्यामध्ये ट्राव्हिस हेडने नाबाद खेळी करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. पांड्याने त्याला 33 धावांवर माघारी पाठवत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. पांडयाने तीन विकेट्स घेत भारताला सामन्यामध्ये माघारी आणलं होतं.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.