AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS, 3rd Odi | तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीममध्ये घातक ओपनरची एन्ट्री

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटच्या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

IND vs AUS, 3rd Odi | तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीममध्ये घातक ओपनरची एन्ट्री
| Updated on: Mar 22, 2023 | 1:56 PM
Share

चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (22 मार्च) तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे हा तिसरा आणि निर्णायक सामना आहे. या निर्णायक सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. तर टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादव गेल्या 2 सामन्यात सातत्याने शून्यावर आऊट झाला होता. यानंतर टीम मॅनेजमेंटने काय निर्णय घेतलाय हे जाणून घेऊयात.

स्टार ओपनरची एन्ट्री

या तिसऱ्या सीरिज डिसायडर सामन्यात टीम प्लेइंग इलेव्हनमध्ये स्टार बॅट्समनची एन्ट्री झाली आहे. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण 2 बदल केलेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर याचं कमबॅक झालं आहे. वॉर्नर याचा कमॅरुन ग्रीन याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तर चेन्नईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याने नॅथन एलीस याच्या जागी एश्टन एगरला खेळवण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

टीम इंडिया अनचेंज

तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचाच अर्थ म्हणजे दुसऱ्या सामन्यातील टीम कायम ठेवण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्यावर टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखवत संधी दिली आहे. सूर्याला पहिल्या दोन्ही सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. तो दोन्ही सामन्यांमध्ये गोल्डन डक अर्थात पहिल्याच बॉलवर आऊट झाला. मात्र त्यानंतरही सूर्याला संधी मिळाली आहे. त्यामुळे कुठेतरी चाहत्यांमध्ये आनंदाचं तर संतापाचं वातावरण आहे.

निर्णायक सामन्यातील टीम इंडियाची कामगिरी

टीम इंडियाला ही सीरिज जिंकण्यासाठी आणि वनडे रँकिंगमधील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणं महत्वाचं आहे. टीम इंडियाचं करो या मरोतील आकडेवारी फार शानदार आहे. टीम इंडियाने 2019 च्या वर्ल्ड कपपासून ते आतापर्यंत एकूण 4 करो या मरोचे सामना खेळले आहेत. या 4 सामन्यातही टीम इंडियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा भारतीय चाहत्यांना असणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....