IND vs AUS 3rd T20: ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी दिलं 187 धावांचं आव्हान, टीम डेविडने झोडला

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 6 गडी गमवून 186 धावा केल्या. तसेच विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या फलंदाजीकडे लक्ष लागून आहे.

IND vs AUS 3rd T20: ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी दिलं 187 धावांचं आव्हान, टीम डेविडने झोडला
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 02, 2025 | 3:25 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 186 धावा केल्या. यासह भारतासमोर विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं आहे. या खेळपट्टीवर 200 धावांचा पल्ला गाठू शकते. या मैदानावर 177 धावांचा पल्ला गाठला गेला आहे. त्यामुळे भारताला 187 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला दोन धक्के बसले आणि बॅकफूटवर गेले. ट्रेव्हिस हेड 4 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर जोश इंग्लिस आला तसा गेला. त्याने 7 चेंडूंचा सामना केला आणि 1 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार मिचेल मार्श आणि टिम डेविडने तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत टीम डेविडने आक्रमक खेळी करत 35 चेंडूत 54 धावा केल्या.

मिचेल मार्श 11 धावांवर असातना वरूण चक्रवर्तीने त्याला चालता केला. त्यानंतर मिचेल ओव्हनला दुसऱ्याच चेंडूवर बाद केलं. यासह वरूण चक्रवर्तीने दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या. यानंतरही टिम डेविडने झंझावात सुरुच ठेवला. त्याने 38 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 74 धावांची खेळी केली. त्याची विकेट पडली आणि भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला. कारण तो अजून टिकला असता तर धावांची गती अधिक असती. टीम डेविडचा झेल 20 धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदर सोडला. त्यानंतर टीम इंडियाला मोठा फटका बसला. त्यानंतर मार्कस स्टोयनिसचं वादळ घोंगावलं. त्याने 32 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत अर्धशतक ठोकलं. मार्कस स्टोयनिस 39 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारून 64 धावांवर बाद झाला. टीम डेविड आणि मार्कस स्टोयनिस यांच्यात 27 चेंडूत 45 धावांची भागीदारी, तर मॅथ्यू शॉर्ट आणि मार्कस स्टोयनिसने 39 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली.

वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 33 धावा देत 2 गडी बाद केले. तर अर्शदीप सिंगने 4 षटकात 33 धावा देत 3 गडी बाद केले.  अक्षर पटेलने 4 षटकात 35 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. जसप्रीत बुमराहच्या बाबतीतही तसंच झालं. त्याने 4 षटकात 26 धावा दिल्या आणि एकही विकेट बाद करता आली नाही.