IND vs AUS | वर्ल्ड कपमधील सहा खेळाडूंना घरचा रस्ता, टी-20 साठी नव्या संघाची घोषणा
वर्ल्ड कपमधील सहा खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने घरचा रस्ता दाखवला आहे. उर्वरित मालिकेसाठी नव्या संघाची घोषणा केली असून नव्य दमाच्या खेळाडूंना संधी दिली आहे. कोणत्या खेळाडूंना संधी मिळाली जाणून घ्या.

मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना होणार आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाल विजय मिळवाव लागणार असून त्यांच्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ असणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जर कांगारूंचा पराभव झाला तर त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. आज कागांरू आपली सर्व ताकद लावतील, प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल केले आहेत.
आजचा सामना गुवाहाटी येथे होणार असून संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. आजच्या सामन्यात सहा खेळाडू बदलले असून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडूंना माघारी पाठवलं आहे. यामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल, अॅडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि सीन अॅबॉट यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाने शेवटच्या तीन टी-20 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा नवा संघही जाहीर करण्यात केला आहे. T20 मालिकेतून माघार घेतलेल्या खेळाडूंपैकी स्टीव्ह स्मिथ आणि अॅडम झाम्पा आज रात्री म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. तर उर्वरित 4 खेळाडू 29 नोव्हेंबरला जाणार आहे. या खेळाडूंना आराम देण्यामागे आणखी एक कारण म्हणजे पुढे टेस्ट सीरीज असणार आहे.
टी20 मालिकेसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ | मॅथ्यू वेड (C), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन