AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Head to Head Records | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात वरचढ कोण? आकडे पाहा

India vs Australia ICC World cup 2023 Final Head to Head Records | टीम इंडियाला 2015 आणि 2019 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता टीम इंडियाने 12 वर्षांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे.

IND vs AUS Head to Head Records | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात वरचढ कोण? आकडे पाहा
| Updated on: Nov 18, 2023 | 2:17 PM
Share

अहमदाबाद | टीम इंडिया विश्व विजेता होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 19 नोव्हेंबरला होणार आहे. या महामुकाबल्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील दिग्गजही सामन्याला हजेरी लावणार आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून 12 वर्षांची प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा सहावी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाने 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. तर ऑस्ट्रेलियाने मायकल क्लार्कच्या कॅप्टन्सीत वर्ल्ड कप उंचावला होता. या महाअंतिम सामन्यानिमित्ताने आपण टीम इंडिया ऑस्ट्रेलिया यांच्यात कोणती टीम वरचढ राहिली आहे, कोणत्या टीमचे आकडे एकमेकांविरुद्धच चांगले आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

वनडेत टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात भारी कोण?

तसेच टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांचा वर्ल्ड कपमधील 151 वा सामना असणार आहे. याआधी दोन्ही संघ 150 एकदिवसीय सामने खेळेले आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला इथेही सर्वाधिक सामन्यात पराभूत केलंय. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वनडेत 83 सामन्यांमध्ये मात केली आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 57 मॅचमध्ये पराभूत केलंय. तसेच 10 सामने हे निकाली निघू शकले नाहीत.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन एबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.