AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | दुखापतग्रस्त श्रेयस अय्यर याच्या जागी टीम इंडियात संजू समॅसन याची एन्ट्री?

टीम इंडियाचा स्टार बॅट्समन श्रेयस अय्यर हा बॅक इंजरीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संजू सॅमसन याला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

IND vs AUS | दुखापतग्रस्त श्रेयस अय्यर याच्या जागी टीम इंडियात संजू समॅसन याची एन्ट्री?
| Updated on: Mar 14, 2023 | 10:44 PM
Share

मुंबई | बॉर्डर गावसकर ट्रॉफी टीम इंडियाने जिकंली. ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पोहचली. आता टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सीरिज होणार आहे. ही मालिका एकूण 3 सामन्यांची असणार आहे. पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे 17 मार्चला करण्यात आलंय. टीम इंडिया आता या सीरिजसाठी तयारीला लागलीय. मात्र त्याआधी दुखापतीमुळे श्रेयस अय्यर हा या मालिकेतून बाहेर झालाय. त्यामुळे या मालिकेआधीच टीम इंडिया अडचणीत सापडली.

श्रेयस अय्यरची जुनी दुखापत नव्याने डोकेदुखी ठरलीय. श्रेयसला फक्त या सीरिजसाठीच नाही, तर त्यानंतर होणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यालाही मुकावं लागू शकतं, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशात श्रेयसच्या जागी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. श्रेयस अय्यर याच्या जागी टीममध्ये विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

सॅमसनला न्यूझीलंड दौऱ्यानंतर वनडे टीममधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर संजूची श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत निवड करण्यात आली होती. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावं लागलं होतं. तेव्हापासून संजू कमबॅक करण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे निवड समिती संजू सॅमसनला संधी देतं का, याकडे लक्ष असणार आहे.

स्टीव्ह स्मिथ कॅप्टन

दरम्यान या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व पॅट कमिन्सऐवजी स्टीव्ह स्मिथ करणार आहे. पॅटच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळणार नाही. तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नाही. यामुळे हार्दिक पंड्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.

वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई

दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम

तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.