IND vs AUS | टीम इंडियाला मोठा झटका, अखेर हा खेळाडू वनडे सीरिजमधून ‘आऊट’

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा खेळणार नाही. तर स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर पडला आहे.

IND vs AUS |  टीम इंडियाला मोठा झटका, अखेर हा खेळाडू वनडे सीरिजमधून 'आऊट'
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 8:33 PM

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केलं. यानंतर दोन्ही संघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका एकूण 3 सामन्यांची असणार आहे. या सीरिजला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा आणि 440 व्होल्ट्सचा झटका लागला आहे. टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू हा या वनडे सीरिजमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा झटका समजला जात आहे.

श्रेयस अय्यर हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर झाला आहे. श्रेयसला बॅक इंजरीचा त्रास सतावतोय. या दुखापतीमुळेच श्रेयसला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत बॅटिंग करता आली नव्हती. तसेच याच दुखापतीमुळे श्रेयसला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडावं लागलं होतं.

या आधीच्या दुखापतीने डोकं वर काढल्याने श्रेयसला मोठा फटका बसलाय. आता श्रेयसला एनसीए अर्था बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आलंय. इथे श्रेयस दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेणार आहे.

हे सुद्धा वाचा

श्रेयसच्या जागी कुणाला संधी?

श्रेयस बाहेर पडल्याने आता त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार, असा सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र श्रेयसच्या जागी विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला संधी मिळणार असल्याचं म्हंटलं जात आहे.

दरम्यान या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व पॅट कमिन्सऐवजी स्टीव्ह स्मिथ करणार आहे. पॅटच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळणार नाही. तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नाही. यामुळे हार्दिक पंड्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.

वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई

दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम

तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई

Non Stop LIVE Update
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.