AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नजर हटी दुर्घटना घटी, हरमनप्रीत बॉलकडे पाहत राहिली अन् निर्णायक क्षणी झाली रनआऊट

भारताचं फायनलमध्ये जाणं जवळपास निश्चित झालं होतं, मात्र एका रन आऊटमुळे होत्याचं नव्हतं झालं.

नजर हटी दुर्घटना घटी, हरमनप्रीत बॉलकडे पाहत राहिली अन् निर्णायक क्षणी झाली रनआऊट
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 23, 2023 | 10:54 PM
Share

ind vs aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सेमी फायनल सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला. मागील वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याचं स्वप्न आजही अधुर राहिलंय. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची खराब सुरूवात झाली होती. स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया 28 धावांवर माघारी परतल्या होत्या. त्यानंतर आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वा सूत्र आपल्या हाती घेतली. एकवेळ सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात होता. मात्र 14 व्या ओव्हरमध्ये संपूर्ण सामना फिरला.

हरमनप्रीत कौरने 34 चेंडूत 52 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. मात्र धावचीत होऊन तंबूत परतली. कारण पहिली धाव हळू घेतली आणि दुसरी धाव सुरूवातीला जोरात घेतली. मात्र शेवटला हरमनप्रीत बॉलकडे पाहत होती अन् तितक्यात तिची बॅट मागे राहिली आणि कीपरने रनआऊट करत130 कोटी भारतीयांच्या स्वप्नांना सुरूंग लागला.

पाहा व्हिडीओ-

हरमनप्रीत गेल्यावर सर्वा आशा होत्या त्या रिचा घोष हिच्याकडून मात्र तिलासुद्धा फार काही कमाल दाखवत आली नाही. सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला खरा मात्र विजयाची नौका खेचुन आणण्याची क्षमता कोणामध्येही दिसली नाही. भारताने शेवटी सामना 5 धावांनी हरला.

भारताचा डाव

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. शफाली वर्मा या सामन्यात अपयशी ठरली. 9 या धावसंख्येवर आता पायचीत होत तंबूत परतली. त्यानंतर स्मृती मंधाना देखील अवघ्या दोन धावा करून बाद झाली. त्यानंतर यास्तिका भाटिका धावचीत झाल्याने तिच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला.

चौथ्या गड्यासाठी जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरनं डाव सावरला. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स चुकीचा फटका 43 या धावसंख्येवर परतली. त्यानंतर हरमनप्रीत कौरची खेळी सुरुच होती. पण धावचीत झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा मावळल्या. दीप्ती शर्मानं डाव सावरला खरा पण तिलाही स्नेह राण , राधा यादव यांची साथ मिळाली नाही. अखेर हा सामना भारताने 5 धावांनी गमावला.

Australia Playing 11 : मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.

Team India Playing 11 : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.

Follow Us
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?