AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS TEST पहायला येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी, कुठल्या मॅचला राहणार उपस्थित?

IND vs AUS TEST Series : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज नेहमीत उत्कंठावर्धक आणि रोमांचक ठरते. या सीरीजकडून सुद्धा अशाच अपेक्षा आहेत. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

IND vs AUS TEST पहायला येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी, कुठल्या मॅचला राहणार उपस्थित?
Narendra modi
| Updated on: Feb 02, 2023 | 10:42 AM
Share

IND vs AUS TEST Series : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागलं आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज नेहमीत उत्कंठावर्धक आणि रोमांचक ठरते. या सीरीजकडून सुद्धा अशाच अपेक्षा आहेत. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या महिन्यापासून सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजला खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजमधील चौथ्या सामन्याला उपस्थित राहणार आहेत. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला हा चौथा सामना आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ॲन्थनी अलबानीस सुद्धा या टेस्ट मॅचला उपस्थित राहतील. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

कुठल्या स्टेडियमवर मोदी राहणार उपस्थित?

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजमधला चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. पुढच्या महिन्यात 9 मार्चपासून हा कसोटी सामना सुरु होईल. स्टेडियम दुरुस्त करुन त्याला पंतप्रधान मोदींच नाव देण्यात आलं. त्यानंतर मोदी पहिल्यांदाच या स्टेडियममध्ये येणार आहेत.

कुठे होणार चार कसोटी सामने?

या टेस्ट सीरीजच्या तयारीसाठी टीम इंडिया आज 2 फेब्रुवारीला नागपूरमध्यए एकत्र होणार आहे. जामठा येथील नव्या स्टेडियममध्ये 3 ते 8 फेब्रुवारी दरम्यान खेळाडूंच ट्रेनिंग सेशन होईल. 9 फेब्रवारीला नागूपरमध्ये पहिला कसोटी सामना होईल. त्यानंतर दिल्ली, धर्मशाळा आणि अहमदाबादमध्ये कसोटी सामने होतील.

सिडनीत बनवली विशेष खेळपट्टी

भारतीय टीम ऑस्ट्रेलियात जाते, त्यावेळी वेगवान खेळपट्ट्यांच आव्हान असतं. तसंच ऑस्ट्रेलियन टीम भारतात येते, तेव्हा फिरकी खेळपटट्यांच त्यांच्यासमोर चॅलेंज असतं. ऑस्ट्रेलियन टीमला त्यांच्यासमोर एव्हरेस्ट सारख चॅलेंज असल्याची कल्पना आहे. ऑस्ट्रेलियाला प्रामुख्याने आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीची प्रामुख्याने धास्ती आहे. त्यासाठी त्यांनी आधीपासूनच तयारी केली. भारतात फिरकीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने सिडनीत विशेष खेळपट्टया तयार केल्या होत्या. त्यावर त्यांनी सराव केला. उत्तर सिडनीमधील बॉन अँड्रयूज ओव्हलवर ऑस्ट्रेलियन टीमने सराव केला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.