AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant चं दणक्यात कमबॅक, बांगलादेश विरुद्ध अर्धशतकी खेळी, टीम इंडिया भक्कम स्थितीत

Rishabh Pant Fifty: टीम इंडिायाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने कमबॅकनंतर 638 दिवसांनी अर्धशतक ठोकलंय. पंतने अर्धशतकी खेळीनंतर फटकेबाजीला सुरुवात केली.

Rishabh Pant चं दणक्यात कमबॅक, बांगलादेश विरुद्ध अर्धशतकी खेळी, टीम इंडिया भक्कम स्थितीत
rishabh pant fiftyImage Credit source: BCCI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 21, 2024 | 11:59 AM
Share

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने 20 महिन्यानंतरं दणक्यात कमबॅक केलं आहे. ऋषभ पंतने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. पंतने चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये कसोटी कारकीर्दीतील 12 वं अर्धशतक पूर्ण केलंय. पंतने या खेळीदरम्यान काही खास फटके मारले. त्यापैकी एक म्हणजे एकहाती मारलेला षटकार. पंतने या दरम्यान चौफेर फटकेबाजी केली. तसेच शुबमन गिलला चांगली साथ देत टीम इंडियाला आणखी भक्कम स्थितीत आणून ठेवलं. त्यामुळे टीम इंडियाला 400 पेक्षा अधिक धावांची सहज आघाडी घेता आली.

पंतने दुसर्‍या डावातील 44 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं. पंतने 88 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. पंत अर्धशतकानंतर आणखी आक्रमक झाला. पंतने टॉप गिअर टाकत आणखी जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. पंतने या फटकेबाजीच्या जोरावर शुबमन गिल आणि त्याच्या धावातील अंतर आणखी कमी केलं. या जोडीने शानदार पद्धतीने बॅटिंग करत पहिलं सत्र भारताच्या नावावर केलं. भारताने पहिल्या सत्रात एकही विकेट गमावली नाही.

पंतचा एकहाती षटकार

भारताने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 124 धावा जोडल्या. पंत आणि गिल या जोडीने चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत 190 बॉलमध्ये 138 रन्सची पार्टनरशीप केली आहे. गिलचं या भागीदारीत 55 धावांचं योगदान आहे. तर पंतने 82 धावा जोडल्या आहेत. यावरुन पंत काय वेगाने खेळलाय, याचा अंदाज येतो. दरम्यान आता टीम इंडिया किती धावांवर आपला डाव घोषित करणार? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पहिलं सत्र भारताच्या नावावर

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

Follow Us
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य