IND vs BAN: ODI सीरीजआधी टीम इंडियाला झटका, दोन गोलंदाजांना दुखापत

| Updated on: Nov 24, 2022 | 12:41 PM

IND vs BAN: रवींद्र जाडेजाच्या जागी 'या' ऑलराऊंडरला टीममध्ये संधी

IND vs BAN: ODI सीरीजआधी टीम इंडियाला झटका, दोन गोलंदाजांना दुखापत
Team india
Follow us on

मुंबई: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा अजून दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे तो बांग्लादेश विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये खेळू शकणार नाहीय. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने सुद्धा जाडेजा फिट नसल्यावर शिक्कामोर्तब केलय. बांग्लादेश विरुद्ध पुढच्या महिन्यात वनडे सीरीज होणार आहे. बीसीसीआयने या टीममध्ये दोन बदल केले आहेत. जाडेजा अजूनपर्यंत गुडघे दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाही. त्याच्याजागी पश्चिम बंगालचा ऑलराऊंडर शाहबाज अहमदला टीममध्ये स्थान दिलय.

विद्यमान निवड समिती बर्खास्त

बांग्लादेश दौऱ्यासाठी सिलेक्शन कमिटीचे मागच्या महिन्यातच वर्ल्ड कप दरम्यान टीम जाहीर केली होती. बीसीसीआयने विद्यमान निवड समिती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कमिटीची नियुक्ती जाहीर करण्याआधी सध्या कामकाज संभाळणाऱ्या कमिटीने दोन दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी रिप्लेसमेंट जाहीर केली आहे. बीसीसीआयने एक प्रेस रिलीज जारी करुन बदलांची माहिती दिलीय.

जाडेजा बाहेर, शाहबाज इन

रवींद्र जाडेजाला आशिया कप 2022 स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे मध्यावरच त्याला आशिया कपमधून बाहेर पडाव लागलं. टी 20 वर्ल्ड कपमध्येही तो खेळू शकला नाही. दुखापत इतकी गंभीर होती की, त्याच्या गुडघ्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. सिलेक्शन कमिटीला जाडेजा पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी त्याची बांग्लादेश विरुद्धच्या वनडे आणि टेस्ट सीरीजसाठी निवड करण्यात आली होती. टीममध्ये निवड केली, तरी फिटनेस टेस्ट पास करणं त्याच्यासाठी अनिवार्य होतं.

टेस्ट सीरीजसाठी जाडेजा उपलब्ध का?

जाडेजाच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमदला टीममध्ये स्थान मिळालय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑक्टोबरमध्ये वनडे सीरीज झाली. त्या मालिकेत शाहबाजने डेब्यु केला होता. जाडेजा कसोटी मालिकेत खेळणार की, नाही, यावर बोर्डाने अजून काही स्पष्ट केलेलं नाही. मेडीकल टीम जाडेजाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे, असं बोर्डाने म्हटलयय.

या वेगवान गोलंदाजाला संधी

जाडेजाशिवाय डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालला सुद्धा दुखापत झालीय. उत्तर प्रदेशच्या या गोलंदाजाला पाठदुखीचा त्रास होतोय. दयालची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली होती. पण आता त्याच्याजागी मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. बोर्डाने याआधी शाहबाज आणि कुलदीप दोघांना न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजसाठी टीममध्ये निवडलय.

भारतीय टीमः रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर आणि कुलदीप सेन.