
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आज 22 जून रोजी सुपर 8 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवला आहे. टीम इंडिया बांगालदेशला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये या धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 146 धावांपर्यंतच मजल मारता आली. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उपकर्णधार हार्दिक पंड्याने आधी अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर 1 विकेट घेतली. तर कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाचा हा सुपर 8 मधील दुसरा आणि एकूण सलग 5 वा विजय ठरला आहे. टीम इंडिया सुपर 8 मधील तिसरा आणि अखेरचा सामना हा 24 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.
टीम इंडियाने बांगलादेशवर 50 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 146 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाचा हा सुपर 8 मधील सलग दुसरा विजय ठरला. तर बांगलादेशचा सलग दुसरा पराभव ठरला.
बांगलादेशने सहावी विकेट गमावली आहे. जाकेर अली 1 धाव करुन आऊट झाला.
बांगलादेशने पाचवी विकेट गमावली आहे. कॅप्टन नजमुल हुसैन शांतो 32 बॉलमध्ये 40 धावा करुन आऊट झाला.
बांगलादेशने चौथी आणि मोठी विकेट गमावली आहे. शाकिब अल हसन कॅच आऊट झाला आहे. कुलदीप यादवने आपल्या बॉलिंगवर कुलदीपला कॅप्टन रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. शाकिबने 11 धावा केल्या.
टीम इंडियाने बांगलादेशला दुसरा झटका दिला आहे. तांझिद हसन 31 बॉलमध्ये 29 धावा करुन आऊट झाला. कुलदीपने तांझिदला एलबीडबल्यू आऊट केलं.
हार्दिक पंड्याने बांगलादेशला पहिला झटका दिला आहे. लिटन दास 10 बॉलमध्ये 13 धावा करुन आऊट झाला आहे.
टीम इंडियाने बांगलादेशसमोर 197 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. टीम इंडियाने उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. इतिहासात अद्याप सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथे इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करता आलेला नाही.
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. शिवम दुबे 24 बॉलमध्ये 34 धावा करुन आऊट झाला.
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. ऋषभ पंत 24 बॉलमध्ये 36 धावा करुन आऊट झाला आहे.
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. विराट कोहली आऊट झाल्यानंतर मैदानात आलेला सूर्यकुमार यादवने पहिल्या बॉलवर सिक्स ठोकला. तर दुसऱ्याच बॉलवर कॅच आऊट होऊन माघारी परतला.
टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. विराट कोहली 27 बॉलमध्ये 38 धावा करुन क्लिन बोल्ड झाला आहे.
टीम इंडियाला चांगल्या सुरुवातीनंतर मोठा झटका लागला आहे. कॅप्टन रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला आहे. रोहितने 11 बॉलमध्ये 23 धावा केल्या.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सुपर 8 सामन्याला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची सलामी जोडी बॅटिंगसाठी मैदानात आली आहे. बांगलादेशने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, शकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप याद आणि, जसप्रीत बुमराह
बांगलादेशने सुपर 8 फेरीतील टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. बांगलादेश कॅप्टन नजमूल हुसैन शांतोने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी 20आय क्रिकेटमध्ये 13 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), शकिब अल हसन, तॉहीद ह्रदोय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, जाकेर अली, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम आणि सौम्या सरकार.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सुपर 8 मधील सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा, येथे होणार आहे.