
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. जोस बटलर हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाची धुरा आहे. सामन्याला 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस झाला. पाहुण्या इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. जोस बटलर याने बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून विराट कोहली दुखापतीमुळे खेळणार नसल्याचं कर्णधार रोहित शर्मा याने टॉस दरम्यान सांगितलं. तसेच टीम इंडियाकडून 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्यात आल्याचंही रोहितने सांगितलंय.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली या सामन्यात खेळणार नाही. विराटला गुडघ्याच्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे. रोहित शर्माने टॉस दरम्यान याबाबत सांगितलं. तसेच आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे विराट आणि बुमराह या दोघांच्या जागी 2 युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा या दोघांचं पदार्पण झालं आहे. विराटच्या जागी संघात यशस्वीला संधी दिली आहे. तर बुमराहच्या जागी हर्षित खेळणार आहे. हर्षितचा संघात बुमराहचा बॅकअप खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
📸 📸
𝙄𝙣 𝙋𝙞𝙘𝙨: Those debut moments, ft. Yashasvi Jaiswal and Harshit Rana 🧢 🧢
Follow The Match ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ryBC6A8z67
— BCCI (@BCCI) February 6, 2025
सामन्याआधी रोहित शर्मा याने ड्रीम कॅप देत यशस्वीचा भारताच्या एकदिवसीय संघात स्वागत केलं. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने हर्षित राणा याला टोपी दिली.
दरम्यान यशस्वीच्या पदार्पणामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये मुंबईचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. कर्णधार रोहित, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल असे 3 मुंबईकर टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये आहेत.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.