टीम इंडियाची पहिल्या वनडे सामन्यात सरशी, रोहित-जयस्वाल फेल; श्रेयस-गिल आणि अक्षर हिट!
भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडला 4 विकेट राखून पराभूत केलं. यासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल गेला. त्याचा खेळ फक्त 2 धावांवर आटोपला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना नागपूरमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण इंग्लंडने 47.4 षटकं खेळत सर्व गडी बाद 248 धावा केल्या आणि 249 धावा जिंकायला दिल्या. भारताने हे आव्हान 38.4 षटकात 6 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. या सामन्याचा निकाल काय लागेल त्यापेक्षा रोहित शर्माला सूर गवसतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं होतं. पण या सामन्यातही रोहित शर्मा फेल गेला. त्याला फक्त 2 धावा करता आल्या. तर यशस्वी जयस्वालही काही खास करू शकला नाही. त्यामुळे टीम इंडिया दडपणात आली होती. पण श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत डाव वेगाने पुढे नेला. एका बाजूने शुबमन गिल सावध खेळी करत होता. तर दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच धूत होता.
श्रेयस अय्यरने 30 चेंडूत अर्धशतकी खेळी पूर्ण केली. श्रेयस अय्यर 36 चेंडूत 59 धावा करत जेकन बेथेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यावेळी त्याने 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 113 धावांवर असताना श्रेयस अय्यरची विकेट गेली. त्यामुळे मधल्या फळीवर दडपण होतं. अक्षर पटेलला वर पाठवत ताण कमी केला. अक्षर पटेलने शुबमन गिलला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. तसेच 47 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला. तिथपर्यंत सामना भारताच्या पारड्यात झुकला होता.
तसेच 47 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला. तिथपर्यंत सामना भारताच्या पारड्यात झुकला होता. पण केएल राहुल मैदानात उतरला पण काही खास करू शकला नाही. त्याने 9 चेंडूत 2 धावा करू बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात उतरला आणि पहिला खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. तर शुबमन गिल शतक पूर्ण करेल असं वाटत असताना 96 चेंडूत 87 धावा करून बाद झाला.