IND vs ENG : दुसऱ्या वनडेनंतर टीमला झटका, खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर! विराटला टेन्शन

India vs England Odi Series 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सलामीचा सामना हा 19 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. तर 12 फेब्रुवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय बदल करत येणार आहे.

IND vs ENG : दुसऱ्या वनडेनंतर टीमला झटका, खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर! विराटला टेन्शन
ind vs eng 2nd odi
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 10, 2025 | 12:21 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने रविवारी 9 फेब्रुवारीला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने सलग दुसर्‍या विजयासह मालिका जिंकली आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली. आता उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा बुधवारी 12 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ हे थेट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. मात्र त्याआधी खेळाडूंमागे लागलेलं दुखापतीचं ग्रहण कायम आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेनंतर आता इंग्लंडमागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.

एकदिवसीय मालिकेत दुखापत झाल्याने या खेळाडूचं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणं नाहीच्या बरोबर म्हटलं जात आहे. इंग्लंडचा युवा खेळाडू जेकब बेथल याला दुखापत झालीय. त्यामुळे जेकबला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकावं लागू शकतं. जेकबला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत आहे. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याने जेकबला दुखापत झाल्याची माहिती कटकमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यानंतर दिली.

जोस बटलर काय म्हणाला?

“प्रामाणिकपणे सांगायचं तर मला खात्री आहे की तो (जेकब) चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. जेकबसाठी हे फार निराशाजनक आहे. जेकब गेल्या सामन्यात चांगला खेळला. जेकब चांगल्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे जेकबचं दुखापतीमुळे बाहेर होणं वाईट बातमी आहे”, असं बटलर म्हणाला.

विराटच्या आरसीबीला टेन्शन

दरम्यान जेकबमुळे फक्त इंग्लंडचं नाही, तर आयपीएलमधील आरसीबी टीमचंही टेन्शन वाढलं आहे. विराट कोहलीही आरसीबीचं प्रतिनिधित्व करतोय. याच विराटच्या आरसीबीने जेकबसाठी आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये 2 कोटी 60 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र जेकबला दुखापतीमुळे आयपीएलच्या 18 व्या मोसमालाही मुकावं लागलं तर तो आरसीबीसाठीही मोठा झटका असेल.

इंग्लंडला मोठा धक्का

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.