IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आणि डाव 233 धावांवर आटोपला. या सामन्यात विराट-श्रेयसने चांगली खेळी केली. पण फलंदाज अपयशी ठरले.

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss
IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 16, 2026 | 9:40 PM

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. कार्डिफच्या मैदानाचा मागचा इतिहास पाहता फार धावा होणार नाही याचा अंदाज क्रीडाप्रेमींना होता. भारताने 44 षटकांचा सामना केला आणि सर्व गडी गमवून 233 धावा केल्या. तसेच विजयसाठी 234 धावांचं आव्हान दिलं आहे. खरं तर इंग्लंडच्या भूमीत हे आव्हान खूपच तोकडं आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे. खरं तर भारताने या सामन्यात चांगली सुरूवात केली होती. मात्र मधल्या फळीत सर्व घोळ झाला. त्यामुळे भारताचा डाव 233 धावांवर आटोपला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर वगळता एकही फलंदाजी मोठी धावसंख्या करू शकलं नाही.

रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागादारी केली. शुबमन गिल 31 धावा करून बाद झाला. तर रोहित शर्माही काही खास करू शकला नाही. रोहित शर्माने 47 चेंडूत 26 धावांची खेळी करून बाद झाला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. केएल राहुलच्या जागेवर संघात स्थान मिळालेला इशान किशनही फेल गेला. त्याचा डाव अवघ्या 1 धावेवर आटोपला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. विराट कोहली बाद झाला आणि भारतीय फलंदाजीला घसरण लागली.

वॉशिंग्टन सुंदर 5 चेंडूत 2, अक्षर पटेल 5 चेंडूत 1, शिवम दुबे खातंही खोलू शकला नाही. गुरनूर ब्रारने 7 धावा केल्या आणि तंबूत परतला. प्रसिद्ध कृष्णालाही खातं खोलता आलं नाही. पण जसप्रीत बुमराहने 13 चेंडूत नाबाद 20 धावांची खेळी करत धावसंख्येत भर घातली.

Follow Us