AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | शुबमन गिल आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची घसरगुंडी

India vs England 2nd Test Day 3 | टीम इंडियाची तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात घसरगुंडी झालीय. शुबमन गिल याच्यानंतर टीम इंडियाने झटपट विकेट्स गमावल्या.

IND vs ENG | शुबमन गिल आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची घसरगुंडी
| Updated on: Feb 04, 2024 | 2:59 PM
Share

विशाखापट्टणम | टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी धमाकेदार कामगिरी केली. यशस्वी जयस्वाल याच्या द्विशतकानंतर जसप्रीत बुमराह याने 6 विकेट्स घेत इंग्लंडला रोखण्यात मोठी भूमिका बजावली. टीम इंडियाने 396 धावांनंतर इंगलंडला 253 धावांवर रोखलं. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने बिनबाद 28 धावा करत 173 धावांची आघाडी घेतली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच जेम्स एंडरसन याने झटपट टीम इंडियाच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. एंडरसनने रोहित शर्मा याच्यानंतर यशस्वी जयस्वाल याला आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 2 बाद 30 अशी झाली. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी करत काही वेळ डाव सावरला. मात्र त्यापुढे या दोघांना जाण्यापासून रोखलं. श्रेयस पुन्हा 30 धावांच्या आत 29 वर आऊट झाला. श्रेयसनंतर रजत पाटीदारही 9 धावा करुन माघारी परतला.

एका बाजूला विकेट जात असताना शुबमन गिल खिंड लढवत होता. गिलने अर्धशतकाचं रुपांतर शतकात करत टीम इंडियाला सुस्थितीत आणून ठेवलं. शुबमनने कसोटीतील तिसरं शतक झळकावलं. मात्र शुबमन शतकानंतर 4 धावा जोडून आऊट झाला. शुबमनने 147 बॉलमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांसह 104 धावांवर आऊट झाला.

शुबमन गिल आऊट झाल्यानंतर पुन्हा टीम इंडियाचा डाव गडगडला. टीम इंडियाने गिलनंतर झटपट आणखी 3 विकेट्स गमावल्या. गिलनंतर अक्षर पटेल 45, श्रीकर भरत 6 आणि कुलदीप यादव झिरोवर आऊट झाला. दरम्यान टीम इंडियाने अद्याप 350 पेक्षा अधिक धावांचा आघाडी घेतली आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच