IND vs ENG 3rd T20 : सूर्यकुमार यादवची हॅटट्रीक, इंग्लंडचा सामन्यापूर्वी पडला चेहरा; झालं असं की…

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी20 सामना राजकोटला होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडिच्या बाजूने लागला आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस विजयाची हॅटट्रीक साधली. टॉस जिंकत सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

IND vs ENG 3rd T20 : सूर्यकुमार यादवची हॅटट्रीक, इंग्लंडचा सामन्यापूर्वी पडला चेहरा; झालं असं की...
Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 28, 2025 | 6:53 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु झाला आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाने जिंकला. कर्णधार सूर्यकुमार यादवने खेळपट्टीचा अंदाज घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्लेइंग 11 मध्ये मोहम्मद शमीला संधी दिली आहे. हा सामना इंग्लंडसाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला तर मालिका गमवावी लागेल. तर हा सामना जिंकता भारताच्या खिशात मालिका जाणार आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक ठरणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. अर्शदीप सिंगला आराम देण्यात आला असून मोहम्मद शमीला संघात स्थान दिलं आहे. मोहम्मद शमी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता. त्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर होता. अखेर त्याने टीम इंडियात कमबॅक केलं. जवळपास 26 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळत आहे.

सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट दिसायला छान आणि कठीण, नंतरही बदलेल असे वाटत नाही. राजकोट हा नेहमीच चांगला ट्रॅक राहिला आहे, खात्री आहे की तो एक चांगला खेळ होईल. आम्हाला वेगळ्या ब्रँडचे क्रिकेट खेळायचे होते, पण त्याचवेळी तुम्हाला परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे आणि तिलकने सामन्याचं स्वरूप जाणून घेतलं. आम्ही येथे तिसरा गेम मालिका म्हणून पाहू. या सामन्यात अर्शदीप विश्रांती घेत आहे आणि मोहम्मद शमी संघात आहे .

दोन्ही संघाची प्लेइंग 11

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती

Follow Us