AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात मोठी खळबळ, तो भयंकर क्षण आलाच, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासाचा..

इराण आणि अमेरिका युद्धात आता अत्यंत मोठी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. युद्धबंदी करार करण्याकरिता त्यांनी धमकी दिली. यासोबतच होर्मुज खाडी खुली करण्याकरिता त्यांनी शेवटी वेळ इराणला दिली. यामुळे युद्ध अधिक भयंकर होणार असल्याचे दिसत आहे.

जगात मोठी खळबळ, तो भयंकर क्षण आलाच, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासाचा..
Donald Trump
| Updated on: Apr 05, 2026 | 8:09 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. युद्धाला एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. अनेक देश युद्धात होरपळले जात आहेत. युद्ध थांबले नाही तर मोठा विनाश होऊ शकतो. ऊर्जेचे गंभीर संकट जगापुढे आहे. कोणत्याही पद्धतीने युद्ध थांबवण्याची मागणी होत आहे. अमेरिकेकडून इराणला युद्धबंदीचा प्रस्ताव देण्यात आला. इराणकडूनही प्रमुख 6 अटी युद्ध थांबवण्याकरिता ठेवण्यात आल्या. इराणने युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुज खाडी बंद केली. होर्मुज खाडी बंद असल्याने जगाची वाट लागली. होर्मुज खाडी खुली करण्याची मागणी केली जात आहे. या एक महिन्यात अमेरिकेने होर्मुज खाडी खुली करण्याकरिता मोठे प्रयत्न केले. धमक्या, हल्ले करण्याचे प्रयत्न नाही ते प्रत्येक अमेरिकेने केले. पण त्यांना होर्मुज खुले करण्यात यश मिळाले नाही. होर्मुजमध्ये जगातील अनेक देशांचे जहाज अडकले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच इराणला मोठी धमकी होर्मुज खाडी खुली करण्याकरिता दिली. मात्र, इराण मागे हटला नाही आणि आपण काहीच करू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर भूमिका बदलली. त्यांनी म्हटले की, आम्हाला होर्मुज खाडीची गरज नाही. आम्ही होर्मुज खाडी वापरत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान जगाकरिता धक्कादायक होते. होर्मुजमधून त्यांनी हात वर केल्याचे बघायला मिळाले.

आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प होर्मुज खाडी खुली करण्याकरिता मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी इराणला 48 तासाचा वेळ दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी 4 एप्रिल रोजी इराणला पुन्हा एकदा इशारा दिला. 48 तासात होर्मुज खाडी खुली करा नाही तर युद्धबंदीचा करार करा. जर तुम्ही हे केले नाह तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या बुशेहर अणुसुविधेवर हल्ला केला.

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हो यांच्याकडून हे विधान करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अशाप्रकारची धमकी इराणला होर्मुज खाडीबद्दल देण्याची ही पहिली वेळ नाही. होर्मुज खाडी खुली करण्याबद्दल अनेक धमक्या डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या आहेत. मात्र, इराण होर्मुज खाडीतून माघार घेताना दिसत नाही. जग जिंकायला निघालेले डोनाल्ड ट्रम्प होर्मुज खाडीत मागे पडताना स्पष्टपणे दिसत आहेत.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?