AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये हार्षित राणा नव्हताच, मग कशी मिळाली गोलंदाजी? नेमकं काय घडलं मैदानात

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी20 सामना रंगतदार वळणावर असताना अचानक पहिल्या दहा षटकानंतर संघात बदल झाला. शिवम दुबे संघातून आऊट झाला आणि हार्षित राणाने सब्सिट्यूट म्हणून टी20 मध्ये पदार्पण केलं. यावेळी त्याने पहिल्या षटकात लिविंगस्टोनची विकेट काढली.

टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये हार्षित राणा नव्हताच, मग कशी मिळाली गोलंदाजी? नेमकं काय घडलं मैदानात
Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 31, 2025 | 10:14 PM
Share

चौथ्या टी20 सामन्यात इंग्लंडने भारताला चांगलंच झुंजवलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. दुसऱ्यात एकही धाव न घेत तीन विकेट गमावले होते. त्यामुळे भारताचा सन्मानजनक स्कोअर होईल की नाही अशी शंका होती. पण हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेने डाव सावरला आणि भारताला 181 धावांपर्यंत पोहोचवलं. खरं तर ही धावसंख्या गाठणं इंग्लंडला वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण बेन डकेट आणि फिल सॉल्टने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली. या जोडीने 62 धावांची भागीदारी केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर रवि बिष्णोईला बेन डकेटची विकेट मिळाली. त्यानंतर दुसऱ्या षटकात अक्षर पटेलने फिलिप सॉल्टला बाद केलं. सातव्या षटकात पुन्हा एकदा रवि विष्णोईने कर्णधार जोस बटलरला बाद केलं आणि सामन्यात असल्याचं दाखवून दिलं. पण या सामन्यात 10 षटकांचा सामना संपला तेव्हा अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्षित राणाची एन्ट्री झाली. पण हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित असलेले आणि टीव्हीवर सामना पाहात असलेल्या प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण 12वं षटक हार्षित राणाच्या हाती सोपवलं गेलं. हार्षित राणा प्लेइंग 11 मध्ये नसताना हे कसं काय शक्य झालं असा प्रश्न सर्वांना पडला. तर त्याचं उत्तर असं की, शिवम दुबेला झालेली दुखापत..

शिवम दुबेने 34 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 53 धावा केल्या. भारताच्या डावात शेवटचं षटक जेमी ओवर्टन टाकत होता. या षटकाचा पाचवा सामना खेळण्यासाठी शिवम दुबे समोर होता. यावेळी शिवम दुबेच्या हेल्मेटवर जोरात चेंडू आदळला. खरं तर हा चेंडू इतका जोरात आदळला की, शिवम दुबेला लागला असणार यात शंका नाही. वैद्यकीय टीम मैदानात धाव घेतली. पण सर्व काही व्यवस्थित असल्याचं सांगत शिवम दुबे शेवटचा चेंडू खेळला. पण फिल्डिंगला मैदानात उतरला नाही. त्याच्या ऐवजी मैदानात हार्षित राणा आला. त्याला कन्सक्शन सब्सिट्यूट म्हणून संघात स्थान मिळालं. त्याच्याकडे कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू सोपवला. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट काढली. लियाम लिविंगस्टोनला तंबूत पाठवलं.

प्लेयर म्हणून हार्षित राणाचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात त्याने विकेट घेत टी20 मध्ये पाऊल टाकलं. टी20 मध्ये कन्सक्शन सब्सिट्यूट पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कसोटी आणि वनडे सामन्यात अशा प्रकारे खेळाडू खेळले आहेत. पण टी20 कन्सक्शन सब्सिट्यूट म्हणून हार्षित राणा हा पहिलाच प्लेयर आहे. यात हार्षित राणा हा शिवम दुबेचा कन्सक्शन सब्सिट्यूट ठरला. कारण दोघंही वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे त्याला संधी मिळाली.

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.